कॉलिवूड ड्रग प्रकरण : रागिणी, संजना यांनी घेतली ३0 जणांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:01 IST2020-09-11T00:00:53+5:302020-09-11T00:01:01+5:30
एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, दोघींनी पोलिसांना स्वतंत्रपणे दिलेल्या यादीत एकूण ३0 जणांची नावे आहेत.

कॉलिवूड ड्रग प्रकरण : रागिणी, संजना यांनी घेतली ३0 जणांची नावे
बंगळुरू : कन्नड चित्रपटसृष्टी अर्थात कॉलिवूडमधील अमली पदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन नट्या रागिणी द्विवेदी आणि संजना गलराणी यांनी आपण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची कबुली देतानाच आणखी ३0 जणांची नावे आपल्या जबाबात पोलिसांना सांगितली आहेत. यात कन्नड चित्रपट सृष्टीतील एक मान्यवर अभिनेत्री, एका राजकीय नेत्याचा मुलगा आणि काही वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, दोघींनी पोलिसांना स्वतंत्रपणे दिलेल्या यादीत एकूण ३0 जणांची नावे आहेत. काही नावे दोघींच्या यादीत समान आहेत. यातील काही जण अमली पदार्थाचे सेवन करतात, तर काही जण तस्करीमध्ये गुंतलेले आहेत. यादीत नाव असलेल्या मान्यवर अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या कन्नड चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तिच्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकल्या जाऊ शकतात.
काही आमदारांची नावेही यादीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवश्यक पुरावा मात्र पोलिसांना उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आम्ही त्यावर काम करीत आहोत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.