शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
2
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
3
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
4
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
5
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
7
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
8
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
9
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
10
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
11
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
12
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
13
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
14
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
15
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
16
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
18
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
19
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

Sanjay Roy News - रेप-मर्डर का केला? गुन्ह्यात आणखी कुणी सहभागी होतं का? पॉलीग्राफ टेस्टमध्ये काय म्हणाला संजय रॉय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:32 IST

सीबीआयचे अधिकारी आरोपीच्या उत्तरावर संतुष्ट दिसून आले नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीची नार्को टेस्टदेखील केली जाऊ शकते.

कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला अत्याच आणि हत्येप्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली आहे. कोलकात्यातील प्रेसीडेंसी कारागृहात सीबीआयसह पोहोचलेल्या सीएफएसएल टीमने रविवारी (25 ऑगस्ट) आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट केली. साधारणपणे साडेतीनतास चाललेल्या या टेस्टदरम्यान संजय रॉयला अनेक प्रश्न विचारण्यात आले. प्रकरणातील सत्य समोर यावे, या उद्देशाने संजय रॉयसह आणखी दोघांची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली.

पॉलीग्राफ टेस्टदरम्यान संजय रॉयला विचारण्यात आले की, कोलकाता केसमध्ये 8 आणि 9 ऑगस्टच्या रात्रीचे संपूर्ण सत्य काय आहे? महिला डॉक्टरवरील बलात्कार-मर्डर प्रकरणात आरोपी संजय रॉयसह आणखी कुणी सहभागी होतं का? मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ट दरम्यान सीबीआयने विचारले की, तो हत्येच्या इराद्याने रुग्णालयात आला होता का? रुग्णालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराचे धागे-दोरे रेप-मर्डर प्रकरणाशी जोडले गेले आहेत का? त्याने या प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरं दिली नाहीत, मात्र चुकीची उत्तरं नक्कीच दिली.

पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी संजयने काय सांगितले? - सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, संजय रॉयने पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान दावा केला आहे की, तो मद्यधुंद होता (त्याने बिअर प्यालेली होती) आणि त्याने चुकून पीडितेला रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये बघितले. आरोपीने म्हटे आहे की त्याचे हेल्मेट चुकून दरवाजावर आदळले आणि ओपन झाले. तसेच आपम जेव्ह  पहिल्यांदा पीडितेला बघितले तेव्हा ती मरण पावलेली होती. यामुळे आपण घाबरलो आणि तेथून पळ काढला, असा दावाही त्याने केला. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, 8 आणि 9 ऑगस्टच्या घटनेसंदर्भात देण्यात आलेली उत्तर खोटी आणि विश्वास ठेवण्यासारखी नाहीत.

जर निर्दोष होता तर तेथून पळ का काढला? पोलिसांना माहिती का नाही दिली? असा प्रश्नही आरोपीला विचारण्यात आला. याशिवाय, त्याच्या विरोधात अत्याचार आणि हत्येसंदर्भात एवढे पुरावे कसे मिळाले आहेत? असा प्रश्नही त्याला करण्यात आला.   सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे दिली नाहीत. तो म्हणाला की भीतीपोटी पळून गेला. मात्र, सीबीआयचे अधिकारी आरोपीच्या उत्तरावर संतुष्ट दिसून आले नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीची नार्को टेस्टदेखील केली जाऊ शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागSexual abuseलैंगिक शोषणdoctorडॉक्टरDeathमृत्यू