Kolhapur Accident News: दुचाकीवरून तरुणी रस्त्यावर कोसळली; डोक्यावरून ट्रक गेल्याने जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 22:27 IST2021-12-18T22:27:34+5:302021-12-18T22:27:54+5:30
Kolhapur Accident News: कामावरून सुटल्यानंतर ती व तिची मैत्रीण अशा दोघीजणी मित्राच्या मोटरसायकलवरून नागाव फाटा येथे येत होत्या.

Kolhapur Accident News: दुचाकीवरून तरुणी रस्त्यावर कोसळली; डोक्यावरून ट्रक गेल्याने जागीच मृत्यू
शिरोली : मोटरसायकल वरून पडलेल्या युवतीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रोहिणी रमेश कांबळे ( वय २०, रा. नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) असे तिचे नाव आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली फाटा येथे उड्डाणपुलावर रात्री सव्वा आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : रोहिणी ही गांधीनगर येथे दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करते. सायंकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे कामावरून सुटल्यानंतर ती व तिची मैत्रीण अशा दोघीजणी मित्राच्या मोटरसायकलवरून नागाव फाटा येथे येत होत्या. शिरोली फाटा येथे महामार्गावर समोरील ट्रकला पाहून रोहिणीच्या मित्राने मोटरसायकलचा ब्रेक लावला. यामध्ये रोहिणी मोटरसायकलवरून महामार्गावर पडली. काही कळण्याअगोदरच पाठीमागून येणारा ट्रक रोहिणीच्या डोक्यावरून भरधाव ट्रकचे चाक गेले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.