मुंबईत मैत्रिणला भेटायला गेलेल्या तरुणांवर चाकू हल्ला 

By नितीन पंडित | Published: October 13, 2023 06:01 PM2023-10-13T18:01:50+5:302023-10-13T18:02:14+5:30

कोनगाव पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Knife attack on youth who went to meet friend in Mumbai | मुंबईत मैत्रिणला भेटायला गेलेल्या तरुणांवर चाकू हल्ला 

मुंबईत मैत्रिणला भेटायला गेलेल्या तरुणांवर चाकू हल्ला 

भिवंडी: मुंबईतील कुर्ला येथे मैत्रिणीस भेटायला गेलेल्या दोघा तरुणांवर चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी तरुणांनी दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका तरुणीचा सुद्धा समावेश आहे.
 
भिवंडी तालुक्यातील पिंपळघर येथील आदित्यराज राजमली गौतम वय १७ वर्ष व त्याचा मित्र अभयसिंग असे दोघे मुंबईतील कुर्ला येथील पोस्टल कॉलनी येथील त्याच्या मैत्रीणीस भेटण्यासाठी गेले होते.मैत्रिणीला भेटत असतांनाच त्या ठिकाणी कोमल व प्रशांत तसेच त्यांचे ओळखीचे इतर दोन इसम असे चार जण त्यांच्या जवळ आले. त्यांनी आदित्यराज व त्याचा मित्र अभयसिंग या दोघांना तुम्ही येथे मुलींना भेटायला आले का? असे बोलून त्यांना शिवीगाळ करीत प्रशांत व त्याच एक साथीदार यांनी धारदार चाकूने आदित्यराज यांच्या पाठीवर व डावे हाताचे खांद्यावर, कमरेवर, पायावर वार करून जखमी केले.

या प्रकरणी दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलिसांनी कोमल, प्रशांत व इतर दोन अशा चार जणांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Knife attack on youth who went to meet friend in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.