नालासोपारा - चूलत भावाच्या वडिलांना का मारले म्हणून जाब विचारल्याचा राग मनात ठेवून आरोपीने 16 वर्षीय अल्पवयीन तरुणावर कोयत्याने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर आणि खांद्यावर सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. जखमी अल्पवयीन तरुणाला उपचारासाठी वसई गावातील वसई विरार महानगरपालिकेच्या सर पेटिट रुग्णालयात भर्ती केले आहे. जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वसई पूर्वेकडील राजावली येथील वाघराळपाडा परिसरातील सोनूदेवी मंदिराजवळ राहणारा जगदीश उर्फ गुरू राजू गांगडे (16) हा त्याचा आते भाऊ मयूर याच्या सोबत बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सोनूदेवी मंदिराच्या बाजूला तलावाजवळील चार रस्ता येथे आरोपी भैया राज यांच्याकडे गेला व मयूर कोल्हेकर याच्या वडिलांना का मारले अशी विचारणा केल्यावर भैया याने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने जगदीशच्या डोक्यात, उजव्या कानाचे खाली मानेवर, गळ्यावर आणि उजव्या हाताच्या खांद्यावर वार करून जखमी केले आहे.
जाब विचारला म्हणून कोयत्याने केला जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 22:20 IST
अल्पवयीन तरुण गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात भर्ती
जाब विचारला म्हणून कोयत्याने केला जीवघेणा हल्ला
ठळक मुद्देजखमी तरुणाच्या फिर्यादीवरून वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.16 वर्षीय अल्पवयीन तरुणावर कोयत्याने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर आणि खांद्यावर सपासप वार करून जीवघेणा हल्ला