शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kiss Day ठरला 'त्या' प्रेमीयुगुलाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 20:53 IST

दोघेही चक्रघरपूर येथील झरझरा गावातील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देया तरुण प्रेमीयुगुलाने एकमेकांना मिठी मारत रेल्वे लोकलखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. दोघांच्या आधारकार्डवरून ओळख पटली. पुढील तपास सुरू आहे.लखीराम गगराई (22) व रायमुनी हांसदा (20) असे आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीचं नाव आहे.

चाईबासा (झारखंड) - व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी म्हणजेच Kiss Day ला प्रेमीयुगुल आनंद साजरा करत असताना झारखंडमधील चाईबासा येथे अतिशय धक्कादायक घटना घडली. आज kiss Day च्या दिवस त्या प्रेमीयुगुलासाठी अखेरचा दिवस ठरला. या तरुण प्रेमीयुगुलाने एकमेकांना मिठी मारत रेल्वे लोकलखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लखीराम गगराई (22) व रायमुनी हांसदा (20) असे आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीचं नाव आहे. दोघेही चक्रघरपूर येथील झरझरा गावातील रहिवासी आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रधरपूर रेल्वे स्थानकात लोकलखाली येऊन एका प्रेमीयुगलाने आत्महत्या केली. घटनास्थळी गेल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली होती. रेल्वे रुळावरून दोन भाग झालेले त्यांचे शव पडले होते. ट्रेन अंगावरून गेल्यामुळे त्यांचे डोके व धड वेगवेगळे झाले होते. दोघांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. दोघांच्या आधारकार्डवरून ओळख पटली. पुढील तपास सुरू आहे.जीआरपीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी चक्रधरपूर रेफरल रुग्णालयात पाठविले. रेल्वे रुळावर त्या दोघांच्याही धड एकमेकांच्या मिठीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अनेक फोटो जप्त केले. दोघेही फोटोत एकत्र होते. मुलीच्या पर्समधून आधार कार्ड आणि एक हजार रुपयेही जप्त केले. दोघांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. मोबाईलद्वारे कुटुंबीयांचा शोध लागला. त्यानंतर जीआरपीने घटनेची माहिती दोन्ही कुटुंबियांना दिली. कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यानंतर आत्महत्येची कारण शोधले जाईल. 

जीआरपी ठाण्याचे प्रभारी अधिकारी यू. के. सिंग यांनी सांगितले की, ही घटना पहाटे ५.३० वाजता घडली. त्वरित स्टेशन मास्तरांना सांगितले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेल्या स्थित मृतदेह आढळले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.

टॅग्स :Suicideआत्महत्याJharkhandझारखंडPoliceपोलिसrailwayरेल्वेValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे