झोपेतच काढला काटा; जुन्या वादातून युवकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यास तासाभरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 02:05 PM2021-05-18T14:05:03+5:302021-05-18T14:06:30+5:30

Murder Case : घटनेनंतर पसार झालेल्या अक्षयला शोधण्यात पोलिसांनी थोडीही कसर सोडली नाही.

The killer who killed the youth in an old dispute was arrested within an hour | झोपेतच काढला काटा; जुन्या वादातून युवकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यास तासाभरात अटक

झोपेतच काढला काटा; जुन्या वादातून युवकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यास तासाभरात अटक

Next
ठळक मुद्देप्रवीण उर्फ पुरुषोत्तम भाऊराव गायकवाड (३०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मारेकरी अक्षय रमेश गोटफोडे याला अवघ्या एक तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बाभूळगाव (यवतमाळ) : जुन्या वादातून लोखंडी पाईपने हल्ला करून युवकाचा झोपेतच खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास येथील नेहरूनगरात घडली. प्रवीण उर्फ पुरुषोत्तम भाऊराव गायकवाड (३०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मारेकरी अक्षय रमेश गोटफोडे याला अवघ्या एक तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जुन्या वादातून प्रवीण हा अक्षयला दारूच्या नशेत नेहमी शिवीगाळ करत होता. याचा वचपा काढण्याची संधी अक्षय शोधत होता. सोमवारी रात्री प्रवीण हा त्याच्या घरासमोर पालथा झोपून होता. हीच संधी अक्षयने साधली. प्रवीणच्या डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला केला. यातच प्रवीण जागीच गतप्राण झाला.



घटनेनंतर पसार झालेल्या अक्षयला शोधण्यात पोलिसांनी थोडीही कसर सोडली नाही. आजूबाजूच्या परिसरात तातडीने शोध सुरू करण्यात आला. हे कार्य सुरू असतानाच सावंगी मांग (ता.बाभूळगाव) येथे अक्षय गोटफोडे याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याजवळून हल्ल्यात वापरलेले साहित्य जप्त केले. ही कारवाई ठाणेदार दिलीप वडगावकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, जमादार अशोक गायकी, हरीभाऊ ठाकरे, सचिन हुमने, प्रशांत पवार यांनी पार पाडली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

  

Web Title: The killer who killed the youth in an old dispute was arrested within an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.