भिवंडीत महिलेची हत्या करून मृतदेह गवतात फेकला; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 17:01 IST2020-09-27T16:59:20+5:302020-09-27T17:01:22+5:30
तालुक्यातील धामणगावच्या हद्दीत मुंबई नाशिक महामार्गावरून धापसीपाड्याकडे जाणाऱ्या पायवाटेच्या रस्त्यातील गवतात हा मृतदेह आढळला

भिवंडीत महिलेची हत्या करून मृतदेह गवतात फेकला; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी - तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धामणगावच्या हद्दीत एका ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अनोळखी महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह गवतात फेकून दिल्याची घटना शनिवारी रात्री समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनोळखी महिलेच्या नातेवाईकांसह हत्येतील आरोपींचा शोध तालुका पोलीस घेत आहेत . याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील धामणगावच्या हद्दीत मुंबई नाशिक महामार्गावरून धापसीपाड्याकडे जाणाऱ्या पायवाटेच्या रस्त्यातील गवतात हा मृतदेह आढळला असून या महिलेची उंची साधारणतः पाच ते साडे पाच फूट असून रंग गव्हाळ असून मृत महिलेच्या अंगावर पोपटी रंगावर काळ्या रंगाचे ठिपके असलेले ब्लाउज तसेच पोपटी व काळ्या रंगाचा पट्ट्या असलेली साडी आहे . तर उजव्या हातावर आशु असे इंग्रजीत लिहिलेले टेटो असून पायात गुलाबी व निळ्या रंगांची पट्या असलेली पिवळी सॅंडल आहे. या मृत माहिलेबाबत कुणाला काही माहिती असेल तर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन वारिष्ठपोलोस निरीक्षक राम भालसिंग यांनी केले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात कलम ३०२ व २०१ प्रमाणे अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.