धारदार चाकुने वार करून पत्नीची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 15:10 IST2021-08-09T15:09:14+5:302021-08-09T15:10:27+5:30

Crime case : धारदार चाकुने वार करून पत्नीची केली हत्या

Killed his wife with a sharp knife | धारदार चाकुने वार करून पत्नीची केली हत्या

धारदार चाकुने वार करून पत्नीची केली हत्या


बुलडाणा : धारदार चाकुने पत्नीची हत्या करून पतीने दाेन चिमुकल्या मुलीसह तलावात उडी घेतली. परिसरातील लाेकांनाह तिघांनाही वाचवले. ही खळबळजनक घटना बुलडाणा शहरातील त्रिशरण चाैकात ९ ऑगस्ट राेजी सकाळी घडली.

जालना येथील गीता गजानन जाधव या बुलडाणा शहरातील त्रिशरण चाैकातील स्मशानभूमी परिसरातील माहेरी आली. दरम्यान तीचा पती गजानन जाधव हा रविवारपासून बुलडाणा शहरातच आला हाेता. त्याने साेमवारी सासरवाडीत जाउन पत्नीवर धारदार चाकून वार केले. तसेच श्रुद्धी आणि श्रेया या चिमुकल्या मुलींना घेउन परिसरातील तलावात उडी घेतली.तलाव वस्तीतच असल्याने परिसरातील लाेकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने धाव घेउन तिघांनाही वाचवले. तसेच गंभीर जखमी झालेल्या गिता जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तिला तपासून मृत घाेषित केले. या प्रकरणी बुलडाणा शहर पाेलिसांनी आराेपी पतीस अटक केली आहे. पुढील तपास बुलडाणा शहर पाेलीस करीत आहेत . संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याचे समाेर येत आहे.

Web Title: Killed his wife with a sharp knife