शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पप्पांची आठवण म्हणून मुलांना टी शर्ट घाला! असं चिठ्ठीत लिहून दोन मुलांच्या हत्येनंतर आईने केले विष प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 18:58 IST

Murder And Suicide Attempt : मुलांच्या खुनप्रकरणी आईवर गुन्हा दाखल प्रकृती गंभीर : उपचार सुरूच; मुलांवर अंत्यसंस्कार

ठळक मुद्देमुलांना गळा दाबून खून केल्याप्रकरणी संबंधित मातेवर कऱ्हाड शहर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कऱ्हाड : दोन मुलांचा खून करून स्वत: विषारी औषध प्राशन केलेल्या मातेची प्रकृती स्थिर मात्र चिंताजनक आहे. तिच्यावर कृष्णा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुलांना गळा दाबून खून केल्याप्रकरणी संबंधित मातेवर कऱ्हाड शहर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरिक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसात दिली आहे. अनुष्का सुजीत आवटे (वय ३६, रा. रुक्मिणीनगर, वाखाण रोड, कऱ्हाड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून हर्ष (वय ८) व आदर्श (वय ६) अशी खून झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाखाण रस्त्यालगत राहण्यास असलेल्या अनुष्का आवटे यांनी विषारी औषध प्राशन करून तसेच हाताची नस कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बुधवारी उघडकीस आले होते. तत्पुर्वी तीने तिच्या हर्ष व आदर्श या दोन्ही मुलांचा टॉवेलने गळा आवळून खून केला होता. तसेच त्यानंतर स्वत: विषारी औषध प्राशन केले होते. सकाळी साडेअकरा वाजुनही मुले घरातून बाहेर आली नसल्यामुळे त्यांच्या आज्जीने बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर नातेवाईकांनी अनुष्का यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तर दोन्ही मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्याठिकाणी त्यांना अनुष्का यांनी लिहीलेली चिठ्ठी आढळून आली. पतीच्या विरहामुळे आपण हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये म्हटले होते. तसेच या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये म्हटले होते. पोलिसांनी ती चिठ्ठी तपासासाठी ताब्यात घेतली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अनुष्का यांच्यावर अद्यापही कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन मुलांचा खून केल्याप्रकरणी अनुष्का यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पप्पांची आठवण म्हणून मुलांना टी शर्ट घाला! 

अनुष्का यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत अनेक कौटुंबिक बाबी लिहील्या आहेत. तसेच माझ्या मुलांना व मला या सर्वातून मोकळे करा, असेही त्यांनी म्हटले आहे. कपाटात दोन टी शर्ट काढून ठेवले आहेत. अंत्यसंस्कारावेळी माझ्या मुलांना पप्पांची आठवण असलेले ते शर्ट घाला, अशी शेवटची इच्छा म्हणून अनुष्का यांनी चिठ्ठीमध्ये लिहीले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल