शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

चिमुकल्याच्या हत्येचा झाला उलगडा, अल्पवयीन मुलीने दिली गुन्ह्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 7:03 PM

Murder : सप्टेंबरमधील गुन्ह्याची आता झाली उकल 

ठळक मुद्देघणसोली गाव येथे राहणाऱ्या ओमकार साठे (०४) याच्या हत्येची घटना १८ सप्टेंबरला घडली होती. ज्या घरात हि गोणी सापडली होती, घटनेवेळी त्या घरात १७ वर्षाची मुलगी एकटीच होती.

नवी मुंबई : घणसोली येथे चार वर्षीय मुलाच्या हत्येची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन बालसुधार गृहात रवानगी केली आहे. अनपेक्षितपणे हातून ही घटना घडल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.घणसोली गाव येथे राहणाऱ्या ओमकार साठे (०४) याच्या हत्येची घटना १८ सप्टेंबरला घडली होती. तो घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. काही तास शोधाशोध केल्यानंतर घराच्या मागेच गोणीत त्याचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात करण्यात आला होता. तर गुन्ह्याची उकल करण्यासाठी रबाळे पोलिसांनी कंबर कसली होती. दरम्यान ओमकार ला ज्या गोणीत गुंडाळले हा होते, त्या गोणीवरून पोलिसांनी तपास सुरु केला होता. यावेळी तशाच प्रकारची गोणी ओमकार राहत असलेल्या इमारतीमध्येच एका घरात आढळून आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, उमेश गवळी यांनी तपासाची दिशा ठरवली होती.ज्या घरात हि गोणी सापडली होती, घटनेवेळी त्या घरात १७ वर्षाची मुलगी एकटीच होती. परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन देखील ती तपासात सहकार्य करत नव्हती. अखेर पोलीस निरीक्षक गोरे यांनी सातत्याने त्या मुलीकडे चौकशी करून तिला विश्वासात घेतले असता, २३ दिवसांनी तिने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र ओमकार सोबत तिच्य घरात नेमके घडले काय यावरच पडदा तिने उलघडलेला नाही. ओमकार हा नेहमी तिच्या घरी खेळायला जात असे. घटनेच्या दिवशी पण तो तिच्या घरी असताना अचानक बेशुद्ध पडला. यामुळे भयभीत झालेल्या या मुलीने त्याला गोणीत बांधून घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून खाली फेकले. यामध्येच त्याचा गुदमरून मृत्यू झाला होता. मात्र तो बेशुद्ध कशाने झाला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. तर तिने गुन्ह्याची कबुली देताच मंगळवारी तिला ताब्यात घेऊन बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईArrestअटक