शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पालघरमध्ये भरदिवसा अपहरण, पोलीस अधिक्षकांचा हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:58 PM

- सातपाटी-पालघर जुन्या रस्त्यावरून आपल्या कंपनीत जाणाऱ्या आरिफ मोहम्मद अली या कंपनी मालकांचे भर दिवसा गुरुवारी दुपारी १२ वाजता पालघर मधील ३ ते ५ लोकांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे.

पालघर  - सातपाटी-पालघर जुन्या रस्त्यावरून आपल्या कंपनीत जाणाऱ्या आरिफ मोहम्मद अली या कंपनी मालकांचे भर दिवसा गुरुवारी दुपारी १२ वाजता पालघर मधील ३ ते ५ लोकांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे.मुंबई येथे राहणारे आरिफ अली यांचे शिरगाव हद्दीतील काशीपाडा येथे अल्फा मेटल कंपनी असून गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते पालघर रेल्वे स्टेशनवर उतरले. तेथून आपल्या अजय म्हस्के या कामगारासोबत रिक्षाने कंपनीकडे जाण्यासाठी निघाले.ही रिक्षा काशी पाडा येथे आल्यानंतर मागून आलेल्या एका पांढºया रंगाच्या स्कॉर्पिया गाडीने रिक्षाचा मार्ग अडविला. त्यातून उतरलेल्या ५ ते ६ लोकांनी रिक्षात बसलेल्या आरिफ अली यांना खेचून बाहेर काढीत स्कॉर्पियोत कोंबून गाडी सुसाट निघून गेली. अचानक झालेल्या या अपहरणाच्या प्रकाराने उपस्थित म्हस्के भांबावून गेला. त्यांनी सरळ पालघर पोलीस स्टेशन गाठून झाला प्रकार पोलिसापुढे कथन केला. पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या कानी हा प्रकार घालण्यात आल्या नंतर पोलिसांची चक्र े वेगाने फिरू लागली.या अपहरणप्रकरणी संशयी म्हणून पालघरमधील प्रशांत संखे, चिंनू संखे व प्रशांत महाजन अशा तीन व्यक्तीची नावे समोर आली असून त्यांचे शेवटचे लोकेशन डहाणू भागात असल्याने पोलिसांनी तपासाची चक्र चोहोबाजूंनी फिरवल्याचे सांगितले. संध्याकाळपर्यंत अपहरणकर्ते आरिफ यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या घरात चिंताग्रस्त वातावरण बनले आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलीस घेतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गुन्हेगारांना पोलिसांचे भयच उरले नसल्याचे दिसून येत आहे.मोबाईल फोन झाला बंदअपहरण करण्यात आलेल्या आरिफ यांचा मोबाईल या घटने नंतर काही काळासाठी सुरू होता. नंतर त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला होता. या अपहरण प्रकरणात अजय म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण