पालघरमध्ये भरदिवसा अपहरण, पोलीस अधिक्षकांचा हस्तक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 23:58 IST2019-05-10T23:58:32+5:302019-05-10T23:58:57+5:30
- सातपाटी-पालघर जुन्या रस्त्यावरून आपल्या कंपनीत जाणाऱ्या आरिफ मोहम्मद अली या कंपनी मालकांचे भर दिवसा गुरुवारी दुपारी १२ वाजता पालघर मधील ३ ते ५ लोकांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे.

पालघरमध्ये भरदिवसा अपहरण, पोलीस अधिक्षकांचा हस्तक्षेप
पालघर - सातपाटी-पालघर जुन्या रस्त्यावरून आपल्या कंपनीत जाणाऱ्या आरिफ मोहम्मद अली या कंपनी मालकांचे भर दिवसा गुरुवारी दुपारी १२ वाजता पालघर मधील ३ ते ५ लोकांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे.
मुंबई येथे राहणारे आरिफ अली यांचे शिरगाव हद्दीतील काशीपाडा येथे अल्फा मेटल कंपनी असून गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते पालघर रेल्वे स्टेशनवर उतरले. तेथून आपल्या अजय म्हस्के या कामगारासोबत रिक्षाने कंपनीकडे जाण्यासाठी निघाले.
ही रिक्षा काशी पाडा येथे आल्यानंतर मागून आलेल्या एका पांढºया रंगाच्या स्कॉर्पिया गाडीने रिक्षाचा मार्ग अडविला. त्यातून उतरलेल्या ५ ते ६ लोकांनी रिक्षात बसलेल्या आरिफ अली यांना खेचून बाहेर काढीत स्कॉर्पियोत कोंबून गाडी सुसाट निघून गेली. अचानक झालेल्या या अपहरणाच्या प्रकाराने उपस्थित म्हस्के भांबावून गेला. त्यांनी सरळ पालघर पोलीस स्टेशन गाठून झाला प्रकार पोलिसापुढे कथन केला. पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या कानी हा प्रकार घालण्यात आल्या नंतर पोलिसांची चक्र े वेगाने फिरू लागली.
या अपहरणप्रकरणी संशयी म्हणून पालघरमधील प्रशांत संखे, चिंनू संखे व प्रशांत महाजन अशा तीन व्यक्तीची नावे समोर आली असून त्यांचे शेवटचे लोकेशन डहाणू भागात असल्याने पोलिसांनी तपासाची चक्र चोहोबाजूंनी फिरवल्याचे सांगितले. संध्याकाळपर्यंत अपहरणकर्ते आरिफ यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या घरात चिंताग्रस्त वातावरण बनले आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलीस घेतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गुन्हेगारांना पोलिसांचे भयच उरले नसल्याचे दिसून येत आहे.
मोबाईल फोन झाला बंद
अपहरण करण्यात आलेल्या आरिफ यांचा मोबाईल या घटने नंतर काही काळासाठी सुरू होता. नंतर त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला होता. या अपहरण प्रकरणात अजय म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.