शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

13 वर्षीय मुलाचे अपहरण, खुन अन् एनकाउंटर...आरोपींच्या पायावर लागल्या पोलिसांच्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 18:04 IST

या चकमकीत सर्व आठ आरोपींच्या पायावर गोळ्या लागल्या. सध्या या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

Auraiya child kidnapping Case: यूपीमधील औरियातून अपहरण, खुन आणि एनकाउंटरचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 13 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्याला ट्रॉली बॅगमध्ये भरले आणि बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली. मात्र, पोलीस त्या मुलापर्यंत पोहोचण्यापूर्वीच गुदमरुन त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर यूपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत सर्व आठ आरोपींच्या पायाला गोळ्या लागल्या.

या घटनेत अवधेश कुमार, दीपक गुप्ता, अंकित, शोभन यादव, जतिन दिवाकर, रवी, आशिष आणि रियाझ उर्फ ​​मुन्ना अशी गोळ्या लागलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. या सर्व आठ जणांच्या उजव्या किंवा डाव्या पायाला गोळी लागली आहे. पाय सोडून शरीरावर इतर कुठेही दुखापत झालेली नाही. तसेच त्याच्या शरीरावरही जखमेच्या खुणा नाहीत. 

23 मार्च रोजी मुलगा घरातून बेपत्ता सविस्तर माहिती अशी की, सराफा व्यावसायिक शकील यूपीच्या औरैया जिल्ह्यातील एरवा कटरा येथे आपल्या कुटुंबासह राहतात. होळीच्या दोन दिवस अगोदर, म्हणजेच 23 मार्च रोजी शकीलचा 13 वर्षांचा मुलगा सुभान मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, यानंतर त्याच्या वडिलांनी शनिवारी रात्रीच पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी मुलगा बेपत्ता झाला, त्याच दिवशी घराशेजारी राहणारा रियाज उर्फ ​​मुन्नाही घरातून बेपत्ता झाला होता. यामुळे संशयाची सुऊ मुन्नाकडे वळली.

ट्रॉली बॅगमध्ये सुभानचा मृत्यू पोलिसांना तपासादरम्यान समजले की, मुन्नासोबत त्याचे अन्य तीन मित्रही घरातून बेपत्ता झाले आहेत. यानंतर मुन्ना आणि त्याच्या तीन मित्रांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता, ते दिल्लीकडे जात असल्याची माहती मिळाली. यानंतर औरैया पोलिसांनी आधी नोएडा पोलिसांशी आणि नंतर दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. मुन्ना सतत चार लोकांशी फोनवर बोलत असल्याचे समजले. हे चौघेही दिल्लीतील कुख्यात गुन्हेगार आहेत. औरैया पोलिसांनी हे इनपुट दिल्ली पोलिसांशी शेअर केले. यानंतर औरैया पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींना सुभानविषयी विचारले असता, त्याला डिक्कीत बंद केल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी डिक्की उघडली, पण तोपर्यंत सुभानचा गुदमरुन मृत्यू झाला होता. 

आरोपींच्या पायावर गोळी...सोमवारी पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी सर्व आरोपींना घेऊन एरवा कटरा जंगल गाठले. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनीही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी सर्व आठ आरोपींच्या पायावर गोळी लागली. या घटनेत काही पोलिसही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणDeathमृत्यू