शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण, हत्याकांडामुळे पोलिसांचा नेभळटपणा उघड; गुन्हेगारांना पूरक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 21:38 IST

हे दोन्ही गुन्हे अजनी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी यावेळी जुजबी कारवाई करून प्रकरण मिटवले. त्यामुळे त्या प्रकरणातील आरोपी  सनी आणि साथीदार  मोकाट राहिले.

नरेश डोंगरे

नागपूर : सनी जागींड अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे नागपुरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील आपसी वैमनस्य आणि पोलिस ठाण्यातील  अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असताना पोलीस कशी नेभळट भूमिका वठवीत आहे, तेसुद्धा उघड झाले असून या थरारकांडामुळे अजनी पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले आहे.

या प्रकरणाच्या निमित्ताने  गुन्हेगारी वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार, फेब्रुवारी २०२० मध्ये आरोपी ललित रेवतकर याच्यावर सनी जांगिड आणि साथीदारांनी कुर्‍हाडीने हल्ला केला होता.  त्यानंतर २० मे रोजी आरोपी स्मारक जाधव आणि  त्याचा भाऊ सुदर्शन जाधव या दोघांवर सनी जांगिड आणि साथीदारांनी प्राणघातक हल्ला चढवला होता.

हे दोन्ही गुन्हे अजनी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी यावेळी जुजबी कारवाई करून प्रकरण मिटवले. त्यामुळे त्या प्रकरणातील आरोपी  सनी आणि साथीदार  मोकाट राहिले. त्याचमुळे  जाधव, रेवतकर आणि त्याच्या साथीदारांनी  सनीच्या  अपहरण आणि हत्येचा कट रचला अन हा गुन्हा घडला. अजनी पोलिसांनी उपरोक्त दोन्ही गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले असते  तर हा भयंकर गुन्हा टळला असता. अजनी पोलिसानी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडता गुन्हेगारांना पूरक भूमिका घेतली. त्याचमुळे हे घडले. म्हणून या अपहरण आणि हत्याकांडाला अजनी पोलिसही जबाबदार असल्याची जोरदार चर्चा आहे.

कुठे आहे पोलिसांचे लक्ष

 एका मोपेडवर भर दुपारी तिघे गुन्हेगार प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला करकचून पकडून बसवतात. त्याचे अपहरण करून पाच ते सात किलोमीटर दूर भरवस्तीतून चौबल सीट नेले जाते. त्यांच्याकडे कोणत्याच पोलिसाचे लक्ष कसे जात नाही, हा कळीचा मुद्दा आहे.

आठ तास छळ, पाच लाखांसाठी फिरवले

आरोपी मोनू रायडर, ललित रेवतकर आणि आकाश शेवारे यांनी सनी जागींडचे शनिवारी दुपारी २.३० ला अपहरण केले. त्याला हुडकेश्वरच्या जंगलात नेऊन तासभर मारहाण केली. जागोजागी चटके दिले. सनी सोडून देण्यासाठी गयावया करीत होता. आरोपींनी त्याला ५ लाख देशील तर सोडून देऊ, असे म्हटले. सनीने तयारी दाखविताच आरोपींनी त्याला नागपूरात आणले. उमरेड मार्गाने इकडे तिकडे फिरवले. सनीने एका ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपींनी त्याला पुन्हा जंगलात नेले आणि रात्री ११ च्या सुमारास त्याची हत्या केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

वरिष्ठांचे आदेश धाब्यावर

या गुन्ह्यामुळे अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर, त्यांच्या हालचालीवर सूक्ष्म नजर ठेवा. आणि त्यांच्या गुन्हेगारी कारवाया नियंत्रित करा, असे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला वारंवार दिले जातात. पोलीस ठाण्यातील अधिकारी वरिष्ठांच्या आदेशवजा सूचना फारशी गांभीर्याने घेत नसल्याचेही या गुन्ह्यातून स्पष्ट झाले आहे.

कसला हिशेब चालतो दिवसभर?

गुन्हेगार मोकाट फिरून अपहरण हत्या सारखे गंभीर गुन्हे करत असताना पोलिस ठाण्यातील अधिकारी दिवसभर कोणता हिशेब तपासण्यात व्यस्त असतात, असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. पदावरील काही मंडळी प्रीती, मोह, मायात गुंतल्याने सैरभैर झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी