अंबरनाथ गायकवाडपाडा भागात विसर्जन मिरवणूक पाहणा-या चिमुरडीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:13 IST2018-09-25T13:00:16+5:302018-09-25T13:13:59+5:30
साडेतीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रय} केला. चिमुरडीची आई आणि शेजा-यांनी तिचा शोध घेतला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात तिच्या रडण्याचा आवाज आला. त्याठिकाणी जाऊन पाहिले असता आरोपी विनोद हा चिमुरडी सोबत होता.चिमुरडीच्या आईने आरोपीला पकडून पोलिसाना या संबंधीची माहिती दिली.

अंबरनाथ गायकवाडपाडा भागात विसर्जन मिरवणूक पाहणा-या चिमुरडीचे अपहरण
अंबरनाथ - विसर्जन मुरवणूक पाहत उभी असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रय} केला. मात्र वेळेत या चिमुरडीची आई आल्याने पुढचा अनर्थ टळला. या प्रकारानंतर आरोपीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा सर्व प्रकार गायकवाडपाडा भागात घडला आहे.
पीडित चिमुरडी गायकवाडपाडा परिसरात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहत होती. त्याच वेळेस आरोपी विनोद केवट याने या चिमुरडीला उचलून झुडपात नेले. चिमुरडीची आई आणि शेजा-यांनी तिचा शोध घेतला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात तिच्या रडण्याचा आवाज आला. त्याठिकाणी जाऊन पाहिले असता आरोपी विनोद हा चिमुरडी सोबत होता.चिमुरडीच्या आईने आरोपीला पकडून पोलिसाना या संबंधीची माहिती दिली. अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाणून अपहरण करणा-या विनोदला ताब्यात घेतले. रात्री उशिरा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अपहरण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीसोबत दुष्कृत्य करण्याच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आले होते.