पळवून नेलेल्या मुलीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:38 IST2021-01-31T01:38:40+5:302021-01-31T01:38:56+5:30
Crime News : कळवा येथे राहणाऱ्या एका ९ वर्षीय मुलीस अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करीत असताना ठाणे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथून ताब्यात घेऊन तिची सुखरूप सुटका केली.

पळवून नेलेल्या मुलीची सुटका
ठाणे - कळवा येथे राहणाऱ्या एका ९ वर्षीय मुलीस अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करीत असताना ठाणे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथून ताब्यात घेऊन तिची सुखरूप सुटका केली. या मुलीला कळवा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
कळवा येथील शांतीनगर भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात २७ जानेवारी रोजी दाखल केली होती. ठाणे गुन्हे शाखेने तपास करताना मिळालेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांची पत्नी जून २०२० मध्ये तीन मुले व पती यास सोडून निघून गेली होती. त्याबाबत कळवा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल आहे.
या महिलेस घटनेच्या दिवशी फिर्यादीच्या घराच्या परिसरात पाहण्यात आले होते. त्यावरून तिने मुलीला नेल्याचा संशय आल्याने तिची माहिती घेतली. ती महिला शिवडी येथे असल्याची माहिती मिळाली. तिचा शोध घेतला असता ही महिला अपहरण झालेल्या मुलीसोबत शिवडी येथे मिळाली. त्या मुलीला ताब्यात घेऊन कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.