उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गुंड गजाआड, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 06:11 PM2022-01-14T18:11:33+5:302022-01-14T18:12:10+5:30

Crime News : एका १७ वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या गुंडाला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरात मधून अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल असून मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

kidnapers minor girl in Ulhasnagar arrest | उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गुंड गजाआड, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

उल्हासनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गुंड गजाआड, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर - एका १७ वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या गुंडाला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरात मधून अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल असून मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे दोन महिन्यांपूर्वी संतोष बाळू सायअण्णा उर्फ अंडापाव याने अपहरण केल्याचा गुन्हा उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हे अन्वेषण विभागाने केल्यावर, गुंड प्रवृत्तीचा संतोष उर्फ अंडापाव याने मुलीला गुजरात येथे घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गुजरातला जाऊन मोठया शिताफरीने गुंड अंडापाव याच्या ताब्यातून मुलीची सुटका करून अटक केल्याची माहिती विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. संतोष सायअण्णा उर्फ अंडापाव हा एका गुन्ह्यात जामिनावर असून टिटवाळा व उल्हासनगर येथील दोन गुन्हेत वॉन्टेड गुन्हेगार असल्याचे पोलीस अधिकारी मांगले म्हणाले.

गुंड प्रवृत्तीचा संतोष सायअण्णा उर्फ अंडापाव याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहेत.

Web Title: kidnapers minor girl in Ulhasnagar arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app