हिमाचलमध्ये खलिस्तानी झेंडे लावणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 09:35 IST2022-05-16T09:34:14+5:302022-05-16T09:35:05+5:30
या प्रकरणात हिमाचल पोलिसांनी अन्य एक आरोपी हरबीर सिंह याला यापूर्वीच अटक केली आहे.

हिमाचलमध्ये खलिस्तानी झेंडे लावणारा अटकेत
बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : हिमाचल विधानसभेबाहेर खलिस्तानी झेंडे लावण्याच्या, तसेच भिंतीवर घोषणा लिहिण्याच्या आरोपाखाली परमजीत सिंह पम्मा याला पंजाब पोलिसांनी चमकौर साहिबच्या सैदपूर येथून गजाआड केले.
या प्रकरणात हिमाचल पोलिसांनी अन्य एक आरोपी हरबीर सिंह याला यापूर्वीच अटक केली आहे. रोपडचे पोलीस अधीक्षक डॉ. संदीप गर्ग यांनी सांगितले की, पम्माला लवकरच हिमाचल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.