Khakitale Hero! The hungry woman fell unconscious on the street, her life saved by the police to donate blood pda | खाकीतला हिरो! भुकेलेली महिला रस्त्यात बेशुद्ध पडली, पोलिसाने रक्तदान करून वाचवले तिचे प्राण 

खाकीतला हिरो! भुकेलेली महिला रस्त्यात बेशुद्ध पडली, पोलिसाने रक्तदान करून वाचवले तिचे प्राण 

ठळक मुद्देजोपर्यंत भारतात असं प्रोत्साहन आणि हुरूप, मनोधैर्य वाढवणारे आहेत, तोवर भारताला कोरोनाच काय तर जगातील कुठलीही ताकत हरवू शकत नाही. तिथून जाणाऱ्या ऑन ड्युटी असलेल्या मध्य प्रदेश पोलिसांनी या महिलेला उचलून उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.

देवास - मध्य प्रदेशात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वाढत आहे. तर दुसरीकडे कर्मवीर आणि सामाजिक सेवा करणाऱ्यांचा हुरूप अधिकच वाढत आहे. जोपर्यंत भारतात असं प्रोत्साहन आणि हुरूप, मनोधैर्य वाढवणारे आहेत, तोवर भारताला कोरोनाच काय तर जगातील कुठलीही ताकत हरवू शकत नाही. याचा प्रत्यय आपल्याला देशभरात होणाऱ्या मदतीवरून दिसून येत आहे. देवास जिल्ह्यात एका खाकीतल्या हिरो म्हणजेच पोलिसाने रस्त्यावर भुकेने बेशुद्ध महिलेचे रक्तदान करून प्राण वाचविले आहेत.

 

लॉकडाऊनदरम्यान देवास जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पायी चालत जाणारी एक महिलाा अचानक बेशुद्ध पडली. तिथून जाणाऱ्या ऑन ड्युटी असलेल्या मध्य प्रदेशपोलिसांनी या महिलेला उचलून उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.

भूक आणि थकवा यामुळे महिलेची अवस्था दयनीय झाली होती. कोरोनामुळे देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. कोणतंही वाहन नसल्यानं ही महिला उन्हात पायी चालत निघाली होती. बेशुद्ध पडलेल्या महिलेची प्रकृती गंभीर होती आणि तिला रक्ताची तातडीने गरज असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. त्यावेळी कोणताही विचार न करता ताबडतोब एका पोलीस कॉन्स्टेबलनं या मजूर महिलेचा रक्त देऊन जीव वाचवला. या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव धर्मेंद्र असं आहे.


देवास येेेहेेतत राहणारी महिला अनेक दिवसांपासून उपाशी होती. त्यामुळे अशक्तपणा आला होता. अशी बिकट अवस्था असूूूनही ती राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या घरी पायी चालत जात होती. लॉकडाऊनमुळे सर्वच वाहतूक बंद होती. त्यामुळे चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. लॉकडाऊनमुळे मजुरीही बंद झाली होती. अशा परिस्थितीत अन्न खायला पैसे नव्हते. महिला भरदुपारी    उन्ह असल्यानेे महिला चक्कर येऊन खाली पडली. त्यावेळी तिला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. रक्त मिळण्यास उशीर झाला असता तर महिलेचा जीव धोक्यात होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, पोलिसाने रक्तदान केल्याने एका मजूर महिलेचा जीव वाचला.

Web Title: Khakitale Hero! The hungry woman fell unconscious on the street, her life saved by the police to donate blood pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.