शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, मारहाण; नातेवाईकांना जखमांचे फोटो पाठवून 'तिने' केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:26 IST

Crime News : हुंड्यासाठी पतीकडून केला जाणारा छळ आणि मारहाण सहन न झाल्याने एका विवाहीतेने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी पतीकडून केला जाणारा छळ आणि मारहाण सहन न झाल्याने एका विवाहितेने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने आत्महत्येपूर्वी मारहाणीमुळे झालेल्या आपल्या शरीरावरच्या जखमांचे फोटो आपल्या नातेवाईकांना 'व्हॉटसअ‍ॅप'वर पाठवल्याने हा भयंकर प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील सस्थामकोट्टामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विस्मया असं 24 वर्षीय विवाहितेचं नाव असून ती पतीसोबत राहत होती. गेल्या वर्षी किरण कुमार नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं. किरण हा राज्य सरकारमध्ये मोटर वाहन विभागाचा कर्मचारी आहे. विस्मयाचा घरामध्ये गळफस घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला. तिच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आत्महत्येच्या आधी विस्मयाने आपल्या नातेवाईकांना 'व्हॉटसअ‍ॅप'वर अनेक मेसेज आणि मारहाणीमुळे झालेल्या जखमांचे फोटो पाठवले होते. पतीकडून हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचं तिने म्हटलं होतं.

विस्मयाने पाठवलेल्या फोटोत तिच्या हातावर, पाठीवर, खांद्यावर आणि चेहऱ्यावर काही जखमा दिसत आहेत. विस्मयाच्या कुटुंबाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि किरण कुमार याच्याकडून विस्मयाचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप देखील केला आहे. विवाहाच्या वेळी विस्मयाच्या कुटुंबांनी किरण कुमारला लाखो रुपये किंमतीची कार, एक एकर जमीन आणि सोनं दिलं होतं. तरी देखील तो पैशासाठी विस्मयाचा छळ करत होता. तिला रोज मारहाण करत होता. पोलिसांनी विस्मयाचा पती किरण कुमार याला अटक केली आहे. तसेच त्याला कामावरून निलंबित करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! लेकीचा 4 सेकंदाचा Voice Message ऐकून कुटुंबाला मोठा धक्का; 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

पंजाबमध्ये मन हेलावणारी एक घटना समोर आली आहे. 3 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा सासरीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुक्तसरजवळील गावात ही धक्कादायक घटना घडली. मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप लावला आहे. तरुणीच्या सासरच्या मंडळींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर दुसरीकडे तरुणीचे पोस्टमार्टम करण्यातही दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त आई-वडिलांनी आंदोलन केलं आहे. गगनदीप कौर असं तरुणीचं नाव असून तिने चार सेकंदांचा एक व्हॉईस मेसेज केला होता. त्यात तिने तिला सल्फास दिल्याचं म्हटलं आहे. 

गगनदीप कौर हिचे नातेवाईक परमजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनदीप कौर हिचं तीन महिन्यांपूर्वी गुरप्रीत सिंग या तरुणाशी लग्न लावून दिलं होतं. लग्नाच्या वेळी परिस्थितीनुसार त्यांना हुंडाही देण्यात आला होता. लग्नाच्या 10 ते 15 दिवसांपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र त्यानंतर सासरची मंडळी हुंड्यासाठी मुलीला त्रास देऊ लागले. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीला मारहाण केली व माहेरी सोडून गेले. त्यानंतर पंचायतीत हे प्रकरण गेलं आणि सर्व भांडण सोडवून मुलगी सासरी गेली. मात्र त्यानंतर पुढील 10 दिवसात सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा मारहाण करुन माहेरी सोडलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdowryहुंडाMONEYपैसाKeralaकेरळPoliceपोलिस