बलात्कारानंतर गर्भवती राहिली सातवीतली विद्यार्थिनी; आरोपी शिक्षक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 15:41 IST2019-08-26T15:41:06+5:302019-08-26T15:41:56+5:30

उत्तर केरळमधल्या मल्लपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

kerala class 7 student pregnant teacher accused of rape | बलात्कारानंतर गर्भवती राहिली सातवीतली विद्यार्थिनी; आरोपी शिक्षक फरार

बलात्कारानंतर गर्भवती राहिली सातवीतली विद्यार्थिनी; आरोपी शिक्षक फरार

मल्लपूरमः उत्तर केरळमधल्या मल्लपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथे शाळेतल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनीशी कथित स्वरूपात बलात्कार केला आहे. सातवीच्या इयत्तेत शिकणारी 12 वर्षांची विद्यार्थिनी गर्भवती राहिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षक गायब झाला असून, त्याचं वय 30 वर्षं आहे. वैद्यकीय चाचणीसाठी त्या विद्यार्थिनीला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी ती गर्भवती असल्याचं उघड झालं.

त्या विद्यार्थिनीचं शिक्षकानं जवळपास दोन महिने लैंगिक शोषण करून तिच्यावर सातत्यानं बलात्कार केला आहे. सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांना यासंदर्भात काहीही कल्पना नव्हती. मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कुटुंबीय आणि पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. समुपदेशनादरम्यान त्या विद्यार्थिनीनं शिक्षक वारंवार बलात्कार करत असल्याचं सांगितलं. फरार आरोपी शिक्षकावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस  प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: kerala class 7 student pregnant teacher accused of rape