केडीएमटीच्या बस चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 21:47 IST2019-01-17T21:44:29+5:302019-01-17T21:47:36+5:30
खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच शिंगोटे यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

केडीएमटीच्या बस चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
ठळक मुद्देदोन ते तीन प्रवासी आणि वाहक बसमध्ये होतेचिंचपाडा येथून गणेश मंदिराकडे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास केडीएमटी बस चालक शिंगोटे घेऊन जात होते.
कल्याण - केडीएमटीच्या बसवरील चालक वसंत शिंगोटे (५२) यांचा आज सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्वेतील चिंचपाडा येथून गणेश मंदिराकडे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास केडीएमटी बस चालक शिंगोटे घेऊन जात होते. यावेळी दोन ते तीन प्रवासी आणि वाहक बसमध्ये होते. गीता हरकीसन दास रुग्णालयाजवळ आलेल्या या बसमधील बॅटरी अचानक फुटली. यामुळे, चक्कर आलेल्या शिंगोटे यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाहतूक कोंडीमुळे विलंब झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच शिंगोटे यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.