Kashmir Terrorist Attack: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद; नागरिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 20:47 IST2021-12-22T20:46:46+5:302021-12-22T20:47:22+5:30
Kashmir Terrorist Attack: काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. तर एक नागरिक जखमी झाला आहे.

Kashmir Terrorist Attack: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद; नागरिक जखमी
जम्मू काश्मीरमध्ये आज पुन्हा दहशतवाद्यांनी स्थानिकांना लक्ष्य केले. काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. तर एक नागरिक जखमी झाला आहे. या हल्ल्यांनंतर शोधमोहिम सुरु झाली आहे.
श्रीनंगरच्या ईदगाह क्षेत्रात दहशतवाद्यांनी बुधवारी सायंकाळी नागरिक रौफ अहमदवर हल्ला केला. अचानक त्याच्यावर फायरिंग करण्य़ात आली. यानंतर दहशतवादी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यानंतर त्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.
या हल्ल्याच्या अर्ध्यातासानंतर दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबिहाडा भागात ड्युटीवर तैनात असलेल्या एएसआयवर हल्ला केला. अवंतीपोराचे मोहम्मद अशरफ यांच्यावर हा हल्ला झाला. त्याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.