२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:35 IST2025-08-01T11:34:28+5:302025-08-01T11:35:39+5:30
एका माजी क्लार्कच्या घरी लोकायुक्ताने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता सापडली आहे.

फोटो - ndtv.in
कर्नाटकातील कोप्पल येथे राहणाऱ्या एका माजी क्लार्कच्या घरी लोकायुक्ताने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता सापडली आहे. कलाकप्पा निदागुंडी असं या माजी क्लार्कचं नाव आहे. आरोपी कलाकप्पाच्या घरातून लोकायुक्तने जप्त केलेल्या मालमत्तेत २४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन, ३५० ग्रॅम सोनं, १.५ किलो चांदी आणि चार गाड्या यांचा समावेश आहे.
सर्व मालमत्ता कलाकप्पा निदागुंडीच्या नावावर, त्याच्या पत्नीच्या नावावर आणि त्याच्या भावाच्या नावावर होती. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या माजी क्लार्कच्या घरातून ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता सापडली त्याचा पगार फक्त १५००० रुपये होता.
तक्रारीनंतर ही छापेमारी करण्यात आली, कोप्पलचे आमदार के. राघवेंद्र हितनल यांनी सखोल चौकशीनंतर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. कलाकप्पा आणि माजी केआरआयडीएल इंजिनिअर झेड.एम. चिंचोलकर यांनी ९६ अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रं तयार करून ७२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुटल्याचा आरोप आहे.