शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

करमुसे मारहाण प्रकरण: गृहमंत्र्यांकडून जितेंद्र आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांनी केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 17:44 IST

Karamuse assault case : ‘त्या’ तीन पोलीस शिपायांच्या निलंबनाची मागणी

ठळक मुद्दे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.

ठाणे : ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात यावी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.

गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाथ’ बंगल्यावर करमुसे या अभियंत्याला 10 ते 15 जणांनी जबर मारहाण केली होती. याच प्रकरणात आधी आव्हाड यांच्या काही कार्यकत्र्याना अटकही झाली होती. त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी यामध्ये आणखी तीन पोलिसांवर अटकेची कारवाई झाली. त्या तिघांचीही जामीनावर सुटका झाली आहे. दरम्यान, यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलिसांवर  निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे शुक्रवारी सोमय्या यांच्यासह ठाणो शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाने केली.

आव्हाड यांच्या निवासस्थानी करमुसे यांना 5 एप्रिल रोजी मारहाण झाली होती. मंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस कर्मचा:यांनीच  करमुसे यांना घरातून नेले होते. सहा महिन्यांनी या तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अद्यापी, या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्याची चौकशीही केलेली नाही. या पाश्र्वभूमीवर भाजपाने पोलीस आयुक्तांना हे निवेदन दिले. या प्रकरणात अटक झालेल्या पोलिसांच्या चौकशीत कोणत्या बाबी उघड झाल्या?  करमुसे यांना घरातून आणण्यासंदर्भात संबंधित त्यांना कोणी आदेश दिला होता? फिर्यादीत, एका मंत्र्यासमोर मारहाण झाल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी कोणता तपास केला? त्याचबरोबर अटक केलेल्या तीन  पोलिस शिपायांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.मंत्री अनिल परब यांनी मध्यमवर्गीयांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या भूखंडावर कब्जा केला आहे. तर सोशल मिडियावर मत व्यक्त करणा:याचे आव्हाड यांनी अपहरण केले. या दोघांवरही कारवाईची भाजपची मागणी असल्याचेही सोमय्या म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAnil Deshmukhअनिल देशमुखthaneठाणेPoliceपोलिसcommissionerआयुक्त