कंगना रणौतच्या हेअर ड्रेसरला अटक, डेटिंग अॅपवरून झाली होती ओळख
By पूनम अपराज | Updated: September 29, 2018 19:00 IST2018-09-29T18:44:18+5:302018-09-29T19:00:19+5:30
रायगड येथे चित्रपटाच्या सेटवरच खार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब्रॅडनला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कंगना रणौतच्या हेअर ड्रेसरला अटक, डेटिंग अॅपवरून झाली होती ओळख
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या हेअर ड्रेसरला एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपान्वये खार पोलिसांनी अटक केली आहे. ब्रॅडन आल्स्टर डिगी (वय ४२) असं या हेअर ड्रेसरच नावं असून तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे.ब्रॅडनची पीडित १६ वर्षीय मुलासोबत एका डेटिंग ऍपवर ओळख झाली. २०१७ पासून पीडित मुलगा एक डेटिंग अॅप वापरत होता. मात्र पीडित मुलाच्या आईला या अॅपबाबत कळल्यानंतर आणि मुलावर झालेल्या लैंगिक शोषणाप्रकरणी आईने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, मुलगा आपण १८ वर्षाचा असल्याचा दावा करत आहे.
पीडित मुलगा शारिरीक उपभोगासाठी डेटिंग अॅप वापरत होता. या अॅपच्या माध्यमातून त्याने १५ व्यक्तींशी शारिरीक संबंध ठेवले. ब्रॅडन सुद्धा या अॅपमुळेच पीडित तरुणाच्या संपर्कात आला. याप्रकरणी माहिती मिळताच मे महिन्यात पीडित मुलाच्या आईने ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी सात आरोपींना अटक केली होती असून ब्रॅडन हा आठवा आरोपी असल्याची माहिती पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. ब्रॅडन हा अभिनेत्री कंगना राणौतचा गेल्या काही वर्षांपासून हेअर ड्रेसर म्हणून काम पाहतो आहे. रायगड येथे चित्रपटाच्या सेटवरच खार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब्रॅडनला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.