शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

कल्याण रेल्वे पोलिसांची उत्तम कामगिरी; ८ कोटीचा मुद्देमाल प्रवाशांना केला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 14:29 IST

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ रेल्वे स्थानके आहेत. कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा इतकी मोठी हद्द आहे.

ठळक मुद्दे शार्दूल यांच्या कार्यकाळात गुन्हे उघडीस येण्याचे प्रमाण जास्त आहे. शार्दूल यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक पदाचा पदभार स्विकारला.

कल्याण - रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशांचे चोरीस गेलेले सोने आणि मोबाईल या प्रकारचा एकूण ८ कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल प्रवाशांना परत करण्याची कामगिरी कल्याणरेल्वेपोलिसांनी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शार्दूल यांनी दिली आहे.कल्याण रेल्वे स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या १६ रेल्वे स्टेशनच्या दरम्यान १९८० पासून रेल्वे लोकल गाडय़ा आणि मेल एक्सप्रेसमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये प्रवाशांचे मोबाईल आणि सोन्याच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. कल्याण रेल्वे स्टेशनकडे २८५० वस्तूंचा मुद्देमाल पडून होता.  त्यात सोन्याचे दागिने, मोबाईल अन्य वस्तूंचा समावेश होता. हा मुद्देमाल प्रवाशांना परत गेला नव्हता. तत्कालीन पोलिस आयुक्त राजेंद्र शेनगावकर यांनी पोलिसांनी विविध गुन्ह्यात आरोपीकडून जप्त केलेला माल परत करण्याची मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी २७०० मुद्देमाल प्रवाशांना परत केला आहे. या मुद्देमालाची किंमत ८ कोटी रुपये इतकी आहे. अनेक प्रवासी हे परराज्यातील असतात. त्यांचे नाव पत्ते शोधून त्यांना बोलावून तर काही प्रवाशांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल परत करण्याची कार्यवाही केली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शार्दूल यांनी सांगितले.शार्दूल यांच्या कार्यकाळात गुन्हे उघडीस येण्याचे प्रमाण जास्त आहे. शार्दूल यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक पदाचा पदभार स्विकारला. २०१८ मध्ये ३ हजर २७८ गुन्हे घडले. त्यापैकी ५०६ उघडकीस आले. ६९६ आरोपींना अटक झाली. २०१९ मध्ये ३ हजार ४९२ गुन्हे घडले. त्यापैकी ६७५ गुन्हे उघडकीस आले. ७४७ आरोपींना अटक केली. २०२० मध्ये ७३३ गुन्हे घडले. १५५ गु्न्हे उघडकीस आले. १८४ आरोपींना अटक झाली. २०२१ मध्ये आतापर्यंत ३५० गुन्हे घडले. त्यापैकी १०५ उघडीस आले. १२२ आरोपीना अक करण्यात आले.कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ रेल्वे स्थानके आहेत. कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा इतकी मोठी हद्द आहे. १६ रेल्वे स्थानकात ५९२ सीसीटीव्ही आहेत. त्यापैकी २०४ सीसीटीव्ही कल्याण रेल्वे स्थानकात आहे. सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख लवकर पटते. रेल्वेने पोलिसांच्या मदतीने संयुक्त सव्रेक्षण आहे. १६ रेल्वे स्थानकात आणखीन प्रत्येकी २६ सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव आहे. या सगळ्य़ा सीसीटीव्हीची कंट्रोलरुमची लिंक कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दिल्यास आरोपी अधिक जलद गतीने पकडणे शक्य होईल याकडे शार्दूल यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेkalyanकल्याणPoliceपोलिसcommissionerआयुक्तpassengerप्रवासीcentral railwayमध्य रेल्वे