शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाखांचे दागिने लुटून सराफाचा खून; संशयिताला नाशकात ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 19:27 IST

The suspect was handcuffed in Nashik : नाशिकरोडमधून बांधल्या मुसक्या ;११ तोळ्यांचे दागिने, चार किलो चांदी घेऊन झाला होता फरार

ठळक मुद्देज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड (२१, रा. शिरुरगाव, जि. बीड) असे या संशयिताचे नाव आहे.

नाशिक : बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील एका सराफ व्यावसायिकाचा मागील महिन्यात खून करुन त्यांच्या ताब्यातील ११ तोळे सोन्याचे दागिने, चार किलो चांदी घेऊन फरार झालेल्या मुख्य संशयित आरोपीच्या नाशिक गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन नाशिकरोडच्या अरिंगळे मळ्यातून मुसक्या बांधल्या. ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड (२१, रा. शिरुरगाव, जि. बीड) असे या संशयिताचे नाव आहे.

शिरुर कासार येथील सराफ व्यावसायिक विशाल कुलथे यांनी संशयित ज्ञानेश्वरची सोन्याचे दागिने बनवण्यासाठी ऑर्डर स्विकारली होती. २० मे रोजी सायंकाळी विशाल हे ज्ञानेश्वरच्या दुचाकीवर बसून दागिने देण्यासाठी गेले. मात्र त्यानंतर ते पुन्हा घरी परतलेच नाही. सखोल चौकशीत विशाल व ज्ञानेश्वर एकाच दुचाकीवरुन सोबत गेल्याचे दिसले. त्यानंतर ज्ञानेश्वर हा फरार झाला होता. बीड पोलिसांनी तपास केला असता ज्ञानेश्वर याने इतर संशयितांच्या मदतीने विशाल यांचा खून करुन त्यांच्याकडील ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ४ किलो चांदी असे ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांचे दागिन्यांची लूट केल्याचे उघडकीस आले. तसेच विशाल यांचा मृतदेह शेवगाव तालुक्यात पुरला. गुन्हा केल्यानंतर ज्ञानेश्वर नाशिकला आश्रयास असल्याची माहिती तेथील पोलिसांकडून शहर पोलिसांना मिळाली. याबाबत गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविली असता वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांनी पथक तयार केले. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सहायक निरीक्षक रघुनाथ शेगर, दिनेश खैरनार, रवींद्र बागुल, नाझीम पठाण, दिलीप मोंढे, विशाल काठे यांच्या पथकाने अरिंगळे मळ्यात सापळा रचला. तेथून ज्ञानेश्वर यास शिताफिने अटक करण्यात आली.पत्नीसोबत होता वास्तव्यासपोलिसांनी ज्ञानेश्वर यास खाकीचा हिसका दाखवून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अरिंगळे मळा परिसरात ज्ञानेश्वर हा त्याच्या पत्नीसोबत घटना घडल्यापासून वास्तव्यास आला होता. या गुन्ह्यातील त्याचे साथीदार आणि मुद्देमाल आदींच्या तपासासाठी त्याचा ताबा पुढील तपासाकरिता बीड पोलिसांकडे सोपिवण्यात आला आहे. विशाल यांचे बंधु कैलास सुभाष कुलथे यांच्या फिर्यादीनुसार बीडमध्ये ज्ञानेश्वरविरुध्द खुन, जबरी लूटीचा गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :RobberyचोरीDeathमृत्यूBeedबीडNashikनाशिकPoliceपोलिस