Valentine Day Affaire Exposed: नुसता धिंगाणा! डीजेवर गाण्याऐवजी विवाहित गर्लफ्रेंडसोबतचे रेकॉर्डिंग वाजले; पतीने येऊन 'नाचवले'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 19:05 IST2023-02-14T19:04:58+5:302023-02-14T19:05:17+5:30
व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येलाच मोठा गजहब झाला, शेजारीनीसोबत लफडे, पतीलाही समजले...

Valentine Day Affaire Exposed: नुसता धिंगाणा! डीजेवर गाण्याऐवजी विवाहित गर्लफ्रेंडसोबतचे रेकॉर्डिंग वाजले; पतीने येऊन 'नाचवले'
इश्क छुपता नही धुपाने से... प्रेम कधी लपत नाही आणि लफडे तर कधीच नाही म्हणतात. असाच एक प्रसंग शाहजहांपूरमध्ये घडला आहे. विवाहित गर्लफ्रेंडसोबतचे गुलुगुलु संभाषण रेकॉर्ड करणे एका तरुणाला चांगलेच भारी पडले आहे. डीजेवर गाणी ऐकत असताना अचानक ते सुरु झाल्याने अख्ख्य़ा गल्लीला ऐकायला गेले आणि नंतर जे झाले, नुसता धिंगाणा...
बंडा पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावातील विवाहित महिला आणि तिच्या शेजारीच राहणारा एक तरुण यांच्या लफडे सुरु होते. सर्वांना याची खबर होती, पण तिच्या पतीला माहिती नव्हते. तो प्रियकर तरुण त्या महिलेसोबतचे संभाषण नेहमी रेकॉर्ड करायचा. तिच्याशी अनेकदा अश्लिल विषयांवर बोलायचा. सोमवारी सायंकाळी प्रियकर त्याच्या घरातील डीजेवर गाणी वाजवत होता, तेव्हा अचानक महिलेचे केलेले रेकॉर्डिंग सुरु झाले आणि मग जे घडले ते साऱ्या गल्लीने पाहिले.
डीजेवर प्रियकर आणि महिलेमधील जे काही बोलणे झाले ते साऱ्या गल्लीला एकायला गेले. यामुळे हे लोक घरातून बाहेरच पडले नाहीत. परंतू, हे रेकॉर्डिंग महिलेच्या पतीला ऐकू गेले आणि त्याचे रक्त खवळले. तो रागारागातच पत्नीच्या प्रियकराच्या घरात घुसला आणि प्रियकराला मारहाण करू लागला. सावध झालेल्या प्रियकरानेही प्रेयसीच्या पतीला मारहाण केली. या प्रकाराची शेजाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. यानंतर पोलिसांनी त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता. प्रेमाची खुमखुमी असलेल्या प्रियकराने पुन्हा वाद सुरु केला आणि पुन्हा मारहाण सुरु झाली. यानंतर पुन्हा पोलिस आले आणि दोन्ही बाजुच्या तीन जणांवर शांती भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.