शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; महिला डॉक्टरचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 18:07 IST

रुग्णावर उपचारामध्ये हेळसांड केल्याच्या प्रकारामुळे जेम्बो हॉस्पिटल सुरु झाल्यापासून चर्चेत आले आहे. विनयभंग प्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : रुग्णांवरील उपचारामुळे सुरु झाल्यापासून वादात सापडलेल्या जम्बो हॉस्पिटलमधील महिला डॉक्टराचाविनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या दोघा डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ योगेश भद्रा व अजय बागलकोट अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. 

रुग्णावर उपचारामध्ये हेळसांड केल्याच्या प्रकारामुळे जेम्बो हॉस्पिटल सुरु झाल्यापासून चर्चेत आले आहे. तेथील व्यवस्थापन बदलल्यानंतर त्यात काहीशी सुधारणा झाली होती़ त्यानंतर गेल्या आठवड्यात येथे दाखल केलेल्या रुग्ण महिलेला नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर डिस्चार्ज देण्यात आला होता़ रुग्ण महिलेच्या आईने जेम्बो हॉस्पिटलबाहेर उपोषण सुरु केल्यानंतर तिचा शोध सुरु झाला़ पोलिसांना ती शनिवारी पिरंगुट घाटात आढळून आली होती़ त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर व आरोपी डॉक्टर हे शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करतात़ दोन दिवसांपूर्वी महिला डॉक्टर ड्युटीवर असताना त्यांच्याशी दोघा आरोपींनी अश्लिल वर्तन करत त्यांचा विनयभंग केला़ मागील एक महिन्यांपासून डॉक्टर महिलेसोबत हा प्रकार सुरु होता, असे समजते़ त्यांनी ही बाब तेथील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती़ तरीही डॉक्टरांकडून तिचा विनयभंग झाल्याने शेवटी तिने शिवाजीनगर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली़ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेdoctorडॉक्टरPoliceपोलिसMolestationविनयभंग