शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रीती दास प्रकरणाचे गौडबंगाल कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:30 IST

शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होऊन आणि पाचपावली तसेच गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास होऊनही पोलिसांनी तपासात नेमके काय केले, ते स्पष्ट झाले नसल्याने जनमानसाठी प्रीती दास प्रकरण गौडबंगाल ठरले आहे.

ठळक मुद्देप्रीतीचे अनेक साथीदार मोकाट : अनेक तक्रारीही अधांतरी : कागदोपत्री नाचले घोडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होऊन आणि पाचपावली तसेच गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास होऊनही पोलिसांनी तपासात नेमके काय केले, ते स्पष्ट झाले नसल्याने जनमानसाठी प्रीती दास प्रकरण गौडबंगाल ठरले आहे.प्रारंभी मधाळ बोलून सलगी साधणारी प्रीती सावज जाळ्यात अडकल्यानंतर त्याच्यासोबत अत्यंत कठोरपणे वागत होती. तिने मधाळ बोलून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि नंतर त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केली. प्रीतीने अनेकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केले. अनेकांची कुटुंबेही प्रीतीने उद्ध्वस्त केली. तिच्या पापाचा घडा फुटल्यानंतर प्रीतीविरुद्ध पाचपावली, लकडगंज, जरीपटका आणि सीताबर्डी ठाण्यात गुन्हे दाखल झाले. मात्र, तपासादरम्यान प्रीतीची कर्तव्यकठोरपणे झाडाझडती घेण्याऐवजी प्रीतीला मदत होईल, अशा टिप्स मिळाल्या. ती कोठडीत असताना तिच्याकडे काहीही मिळत नसल्याचे पोलीस सांगत होते. दुसरीकडे गुन्हे शाखेने तिला ताब्यात घेताच तिच्याकडून रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे पाचपावली पोलिसांनी तिचा तपास प्रामाणिकपणे केला नाही, हे अधोरेखित झाले आहे. हा एकच मुद्दा नाही तर असे अनेक संशयास्पद मुद्दे आहेत, ज्यामुळे पाचपावली पोलिसांसोबत असलेली घनिष्ठता चर्चेला आली आहे. गुन्हे दाखल होण्यापूर्वी गोडबोले प्रीतीच्या दिमतीला राहायचा. गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याने तिला भरपूर मदत केल्याचा आरोप आहे. गोडबोलेसोबत आणखी काही नावे प्रीतीसोबत चर्चेला आली होती. वरिष्ठांकडून त्याकडे का लक्ष देण्यात आले नाही, असा प्रश्न आहे.का झाले बेदखल?प्रीतीच्या सांगण्यावरून पाचपावली पोलिसांनी अनेकांना प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यांचे आर्थिक शोषण करण्यात आले. त्यातील एका पीडिताचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रीतीला ज्या कथित नेत्याने साथ दिली त्याचीही चौकशी करण्याचे पोलिसांनी टाळले. प्रीतीविरुद्ध शीतल आणि इरशादने तक्रारी दिल्या. मात्र, तक्रार दिल्यानंतर ते पुन्हा ठाण्यात येणार नाहीत, अशी पाचपावलीतील प्रीतीच्या साथीदारांनी व्यवस्था केली. दुसरीकडे ते ठाण्यात येतच नाहीत, असा कांगावाही केला आहे. व्हिडिओ, तक्रारी, ओरड सारेच्या सारेच बेदखल झाल्याने पोलिसांची कुख्यात प्रीतीवरची माया होती तशीच असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी