अजितदादा, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोलकर होते 'हिटलिस्ट'वर; नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ATSचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 13:39 IST2018-08-31T13:35:22+5:302018-08-31T13:39:18+5:30
Nalasopara Weapon Case: अविनाशचा अन्य आरोपींसोबतचा सहभाग स्पष्ट करा असा सवाल करत न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच काही वेळेकरिता सुनावणी तहकूब केली आहे.

अजितदादा, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोलकर होते 'हिटलिस्ट'वर; नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ATSचा गौप्यस्फोट
मुंबई : नालासोपारा स्फोटक प्रकारणातील घाटकोपर येथील भटवाडीतून अटक केलेला पाचवा आरोपी अविनाश पवार याच्या पोलीस कोठड़ीत १४ दिवसांची वाढ करण्याची एटीएसने मागणी सत्र न्यायालयात केली आहे. मात्र,अविनाशचा अन्य आरोपींसोबतचा सहभाग स्पष्ट करा असा सवाल करत न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच काही वेळेकरिता सुनावणी तहकूब केली आहे.
एटीएसने गेल्या आठवड्यात शनिवारी घाटकोपर येथील भटवाडीतून अविनाश पवार या तरूणाला बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) अटक केली होती. अविनाश पवारची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केस डायरीचे वाचन केले. त्यावेळी हिंदू धर्माविरुद्ध बोलणारे आणि अजितदादा, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्त दाभोलकर, रितू राज 'हिटलिस्ट'वर होते असल्याचे केस डायरीतून नावं उघड झाली. त्याचप्रमाणे पवारने काही ठिकाणांची रेकी केली असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. तसेच पवारने राज्याबाहेरून शस्त्र प्रशिक्षण घेतले होते.
स्फोटके प्रकरणातील पवारच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती