गळफास घेण्याचं नाटक महिलेच्या जीवावर बेतलं; स्टूलावरून पाय घसरला अन् काही क्षणातच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 16:32 IST2021-03-13T16:29:47+5:302021-03-13T16:32:02+5:30
गळफास घेतल्याचा फोटो काढतेवेळी खाली घेतलेल्या स्टूलावरून पाय घसरला आणि महिला थेट मृत्यूच्या दारात गेली.

गळफास घेण्याचं नाटक महिलेच्या जीवावर बेतलं; स्टूलावरून पाय घसरला अन् काही क्षणातच मृत्यू
धनबाद – झारखंडच्या धनबाद येथे खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी ३२ वर्षीय तारा देवी महिलेला गळफास घेण्याचं नाटक करणं महागात पडलं आहे, जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला तेव्हा सगळेच जण आश्चर्य व्यक्त करू लागले, ८ वर्षाच्या मुलीच्या माहितीनुसार, आईने वडिलांना भीती दाखवण्यासाठी गळफास घेण्याचं नाटक करत होती, कारण मुलगी आईचा गळफास घेतलेला फोटो वडिलांना पाठवू शकेल. परंतु नियतीला काही भलतंच मान्य होतं.
गळफास घेतल्याचा फोटो काढतेवेळी खाली घेतलेल्या स्टूलावरून पाय घसरला आणि महिला थेट मृत्यूच्या दारात गेली. धनबादच्या रामकनाली परिसरातील ही घटना आहे. ज्याठिकाणी पती मनोज मेहता यांनी तारासोबत दुसरं लग्न केले, ताराने आपल्या कुटुंबाच्याविरोधात जाऊन हे लग्न केले होते, तर ताराची आई गौरीने सांगितलं की, हे तिचं दुसरं लग्न होतं, कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने हे पाऊल उचललं परंतु मनोजकडूनही तिला सुख मिळालं नाही, अखेर तिने आत्महत्या केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ताराचा एक व्हिडीओ सापडला आहे, त्यात ती म्हणते की, संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात जाऊन मी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंत हा माणूसही तसाच निघाला, मनोज यांची ८ वर्षाची मुलगीही आहे जी मनोज आणि तारा यांच्यासोबत राहत होती. मुलीचं म्हणणं आहे की, वडिलांना भीती दाखवण्यासाठी आईने गळफास घेण्याचं नाटक केले, गळफास घेतलेला फोटो पाहून वडील घाबरतील. पण गळफास घेताना आईचा पाय स्टूलावरून घसरला आणि ती तडफडू लागली. त्यानंतर मी आरडाओरडा करून लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला पण कोण आलं नाही, मग बाहेर जाऊन मी लोकांना बोलावलं तोपर्यंत आईचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. सध्या रामकनाली पोलिसांचे म्हणणं आहे की, या घटनेचा तपास सुरू आहे, त्यानंतर याबाबत स्पष्टता येईल तोपर्यंत काही बोलता येणार नाही.