चुलत भावाच्या मदतीनं आईचा खून, मृतदेह विहिरीत फेकला; हत्येचं कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 17:36 IST2021-07-29T17:31:23+5:302021-07-29T17:36:31+5:30

दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक; चौकशीत गुन्ह्याची कबुली

jharkhand son murdered his mother illegal relationship police arrested | चुलत भावाच्या मदतीनं आईचा खून, मृतदेह विहिरीत फेकला; हत्येचं कारण वाचून चक्रावून जाल

चुलत भावाच्या मदतीनं आईचा खून, मृतदेह विहिरीत फेकला; हत्येचं कारण वाचून चक्रावून जाल

पलामू: झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एका मुलानं स्वत:च्याच आईची हत्या केली आहे. चुलत भावाच्या मदतीनं मुलानं आईचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. 

आरोपी मुलाच्या आईचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे मुलगा नाराज होता. त्यानं वारंवार आईला संबंध संपवण्यास सांगितलं. मात्र आईनं ऐकलं नाही. त्यामुळे मुलगा संतापला. त्यानं आपल्या चुलत भावासोबत मिळून आईच्या खुनाचा कट रचला. त्यानंतर संधी मिळताच त्यानं आईची हत्या केली आणि मृतदेह नदीत फेकून दिला.

पलामू जिल्ह्यातल्या छतरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लठेयामधील गोठा गावात ही घटना घडली. मुलानं त्याच्या भावाच्या मदतीनं १६ जुलैला आईची हत्या केली. त्यानंतर आईचा मृतदेह दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत फेकला. महिलेचं नाव गीता देवी असं आहे. १७ जुलैला पोलिसांना मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

प्राथमिक तपासात पोलिसांना मुलगा मुकेश कुमार आणि त्याचा भाऊ गुरुदेव पासवानचा संशय आला. दोघेही हुसेनाबादच्या महुअरीत वास्तव्यास आहेत. पोलीस चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनी हत्येच्या कटात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. दोघांना न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. 

Web Title: jharkhand son murdered his mother illegal relationship police arrested