बंद असलेल्या घरातून लाखोंचा माल लंपास, चोराने एका रूममध्ये जाळले नोटांचे बंडल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:55 AM2021-06-22T10:55:40+5:302021-06-22T10:57:32+5:30

ही घटना रांचीच्या बरियातून भागातील आहे. येथील बरियातून हाउसिंग कॉलनीमध्ये चोरांनी एका घराला शिकार केलं. हे घर गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद होतं.

Jharkhand locked house jewellery cash theft burning notes police investigation crime | बंद असलेल्या घरातून लाखोंचा माल लंपास, चोराने एका रूममध्ये जाळले नोटांचे बंडल

बंद असलेल्या घरातून लाखोंचा माल लंपास, चोराने एका रूममध्ये जाळले नोटांचे बंडल

Next

झारखंडची राजधानी रांचीमधून चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. इथे चोरांनी एका बंद पडलेल्या घरावर दरोडा टाकला. येथून ते सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. मात्र, चोरीच्या घटनेदरम्यान चोरांना एका रूममध्ये नोटांचे बंडलही जाळले. घरातील काही साहित्यही  चोरांनी जाळलं. पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.

ही घटना रांचीच्या बरियातून भागातील आहे. येथील बरियातून हाउसिंग कॉलनीमध्ये चोरांनी एका घराला शिकार केलं. हे घर गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद होतं. पोलिसांनुसार घराचे मालक आपल्या खाजगी कामासाठी १२ जूनला जिल्ह्याबाहेर गेले होते. जेव्हा ते परतले तेव्हा घराचा नजारा पाहून धक्का बसला.

त्यांच्या घराचं लॉक तोडलेलं होतं. घरातील कपाटातील सामानही अस्ताव्यस्त पडलेलं होतं. पीडित परिवारानुसार चोरांनी त्यांच्या घरातून ६० हजार रूपये कॅश आणि सोन्याचे काही दागिने चोरी केले. त्यासोबतच चोरांनी एक अजब काम केलं. त्यांनी घरातील काही वस्तू जाळल्या. आणि सोबतच हजारो रूपयांच्या नोटांचे बंडलही जाळले.

वस्तू आणि नोटांच्या बंडलाला आग का लावली गेली? असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. घरमालकाने लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलीस आता तेथील सीसीटीव्हीतून चोरांचा शोध घेतला जात आहे. 
 

Web Title: Jharkhand locked house jewellery cash theft burning notes police investigation crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.