झारखंडच्या फरार खुन्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 01:14 IST2019-10-01T01:13:51+5:302019-10-01T01:14:27+5:30

खूनप्रकरणी दीड वर्षापासून फरार असलेल्या झारखंड राज्यातील आरोपीला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने धोबीघाट परिसरातून अटक केली.

Jharkhand killer arrested | झारखंडच्या फरार खुन्याला अटक

झारखंडच्या फरार खुन्याला अटक

उल्हासनगर : खूनप्रकरणी दीड वर्षापासून फरार असलेल्या झारखंड राज्यातील आरोपीला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने धोबीघाट परिसरातून अटक केली. आरोपीने यापूर्वी दोन खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगल्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीदरम्यान फरारी आणि हद्दपारीची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींचा शोध शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घेत होते. त्यावेळी झारखंड राज्यातील एक आरोपी खूनप्रकरणी फरार असल्याची माहिती मिळाली. तो म्हारळनाका येथे येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषणला मिळाली. रविवारी म्हारळगाव नाका येथे सापळा लावला. सायंकाळी ६.३० वाजता संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीला पथकाने ताब्यात घेतले. त्याचे नाव राजेंद्र यादव (४५) असून तो झारखंडमध्ये राहणारा आहे. जमीनवादातून २०१८ मध्ये एकाला गोळी घालून त्याने ठार मारल्याची, तर १९९९ मध्ये एकाला चाकूने तर दुसºयाला पाण्यात बुडवून मारले होते.

Web Title: Jharkhand killer arrested