महिलेला चाकूचा धाक दाखवून सव्वा लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 22:20 IST2021-02-10T22:20:25+5:302021-02-10T22:20:35+5:30

भागवतराव गायकवाड हे  छाजेड नगरात वास्तव्यास आहेत.  बुधवारी पहाटे घराच्या मागील बाजूने दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला.  गायकवाड यांच्या पत्नी भारती यांना चाकूचा धाक दाखवून दागिने व पैशाची मागणी केली. 

jewelry theft from women of1.25 lakhs | महिलेला चाकूचा धाक दाखवून सव्वा लाखाचे दागिने लंपास

महिलेला चाकूचा धाक दाखवून सव्वा लाखाचे दागिने लंपास

जामनेर जि. जळगाव : अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवित तब्बल १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटे साडेतीन वाजता पहूर ता.जामनेर येथील  महेश छाजेड नगरात घडली. 


भागवतराव गायकवाड हे  छाजेड नगरात वास्तव्यास आहेत.  बुधवारी पहाटे घराच्या मागील बाजूने दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला.  गायकवाड यांच्या पत्नी भारती यांना चाकूचा धाक दाखवून दागिने व पैशाची मागणी केली. 
संबंधित महिला घाबरल्याने किचन ओट्याखाली ठेवलेला डबा चोरट्यांना दिला. यातील ३ ग्रॅम वजनाचे १२ हजार किमतीचे डोरले, २४ हजार किमतीचे सहा ग्रॅमचे पदक, १६ हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे वेल, ४० हजारांचा दहा ग्रॅम वजनाचा नेकलेस, दोन ग्रॅम वजनाचे आठ हजार किमतीच्या दोन नथ असे एक लाख सोळा हजार वजनाच्या सोन्याचे दागिने लंपास केले.


याप्रकरणी भारतीबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून दोन  चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर महिला बेशुद्ध
 चोरट्यांनी पळ काढल्यानंतर महिला घाबरल्याने बेशुद्ध स्थितीत पडून होती. सकाळी पती उठल्यावर हा प्रकार उघडकीस आला.


पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याने घडलेल्या घटनांचा तपास उघडकीस येण्यासाठी अडचणी येत आहेत. पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी व नवीन वाहन मिळण्याकरिता वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करणार आहोत.
- भारत काकडे, डीवायएसपी, जामनेर

Web Title: jewelry theft from women of1.25 lakhs