शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:56 IST

मंत्र्यांच्या घरात २० वर्षांपासून असलेल्या नोकराने तब्बल ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

यूपी सरकारचे मंत्री रघुराज सिंह यांच्या घरात चोरी झाली आहे. मंत्र्यांच्या घरात २० वर्षांपासून असलेल्या नोकराने तब्बल ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. आता मंत्र्याच्या मुलाने नोकरांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत २४ तासांत चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित दागिने जप्त करण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत.

रघुराज सिंह यांच्या घरातून फेब्रुवारी महिन्यात लाखोंचे दागिने चोरीला गेले होते. त्यावेळी मंत्र्यांच्या पत्नीची तब्येत बिघडली होती आणि त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते. नंतर पत्नीचा मृत्यू झाला. मात्र याच दरम्यान कुटुंबातील सर्व सदस्य दिल्लीतच उपचार आणि हॉस्पिटलमध्ये व्यस्त होते.

मंत्री रघुराज सिंह यांचा मुलगा निशू ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा २० वर्षे जुना नोकर सोनू, सागर आणि त्यांची आई या घरात राहत होते. घरातून दागिने चोरीला गेल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. त्यानंतर माहिती मिळाली की, त्यांच्या नोकराने चोरी केली होती. त्यावरून पोलिसांनी चौघांना अटक केली.

या घटनेवर मंत्री रघुराज सिंह म्हणाले की, घरात काही मौल्यवान वस्तू होत्या, ज्या पूर्वजांकडून मिळाल्या होत्या, त्यामध्ये जवळपास अर्धा किलो सोने आणि ५-६ किलो चांदी असू शकते. माझी पत्नी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल झाली तेव्हा मी आणि माझी दोन मुलं तिच्यासोबत होतो. त्याच काळात जुन्या नोकराने चोरी केली. असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं. आम्ही त्यावेळी कोणाला सांगितलं नाही कारण आम्हाला आमच्या पत्नीच्या निधनाचं खूप दुःख होतं. त्यातच तीन-चार महिने निघून गेले. 

आरके सिसोदिया म्हणाले की, बन्ना देवी पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये मंत्र्यांच्या घरातून सुमारे ५० लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती मिळाली होती, ज्यात सोन्या-चांदीचे दागिने होते. चोरावर संशय बळावला. माहितीच्या आधारे योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करून चोरीच्या मालासह चार आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरित वस्तू परत मिळविण्यासाठी तीन पथकं प्रयत्न करत आहेत. कायदेशीर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशtheftचोरी