शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

तळेगाव दाभाडे येथे ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून २७ लाखांच्या दागिन्यांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:25 PM

घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद..

ठळक मुद्देतळेगाव येथील मारुती मंदिर चौकाजवळील मुख्य बाजारपेठेत ज्वेलर्सचे दुकान

तळेगाव दाभाडे : येथील मुख्य  बाजारपेठेतील ज्वेलर्सच्या दुकानामधून अज्ञात चोरट्याने २७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १० हजार रुपए लंपास केले. सोमवारी (दि. ३०) सकाळी हा प्रकार घडला. सीसीटीव्ही कॅमेºयात चोरटा कैद झाला आहे. तपासासाठी पोलिसांची पाच पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आल्याची  माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अशोक जव्हेरचंद ओसवाल (वय ५६, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव येथील मारुती मंदिर चौकाजवळील मुख्य बाजारपेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी सकाळी साडेसहाच्या  सुमारास फिर्यादी ओसवाल मित्रांसह मुंबईकडे रवाना झाले. जाताना दुकानाचे शटर खाली घेतले व सुनेला ते आतून बंद करण्यास सांगितले. मात्र शटर आतून बंद करण्याबाबत त्या विसरल्या. दरम्यान, त्या खाली येण्याआगोदर अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करून १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने,  २५ लाख ७० हजार ४०० रुपये किमतीचे ६८ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ६ हजार रुपये किमतीची बेन्टेक्स ज्वेलरी, २ हजार ९०० रुपये किमतीचे गजलक्ष्मीचे दोन नग, रोख रक्कम १० हजार रुपये, तसेच ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण २७ लाख ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून चोरट्याने हा ऐवज दुकानातील कचरा गोळा करण्याच्या गोणीतून नेला. चोरट्यास स्ट्राँग रूमकडे जाता आले नाही. सुमारे १७ मिनिटांचा चोरीचा हा  प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास तातडीने पाचारण करण्यात आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलिसांनी पाच पथके लोणावळा, कामशेत, देहूरोड, पुणे, मुंबई या ठिकाणी रवाना केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjewelleryदागिनेtheftचोरी