शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जावेद हबीबच्या अडचणीत वाढ, उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:49 IST

Javed Habib : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहून हबीबवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. हबीबच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली.

केस कापताना महिलेच्या डोक्यात थुंकणाऱ्या जावेद हबीबने आता एक व्हिडिओ जारी करून जाहीर माफी मागितली आहे. यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल माफी मागतो, असे त्याने म्हटले आहे. यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशपोलिसांना पत्र लिहून हबीबवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. हबीबच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली.पीडितेने मन्सूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाहा व्हिडिओ ६ जानेवारी रोजी समोर आला, त्यानंतर तो व्हायरल झाला. पूजा गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची बागपत जिल्ह्यातील बरौत शहरातील असून ब्युटी पार्लर चालवते. याप्रकरणी पूजाने जावेद हबीबविरुद्ध मुझफ्फरनगरमधील मन्सूरपूर पोलिस ठाण्यात ६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. हबीबविरुद्ध आयपीसी कलम ३५५, ५०४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरच त्याच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शने केली.

तिथे काय झाले?कार्यशाळेदरम्यान जावेद हबीब यांनी महिलेच्या केसांवर थुंकताना इस थूक में दम है असं हबीबने सांगितले. त्याने महिलेचा अपमान केला आणि सांगितले की तिचे केस खराब आहेत, कारण तिने शॅम्पू केला नाही. यानंतर, महिलेच्या केसांना विंचरताना तो म्हणतो की, केसांमध्ये पाण्याची कमतरता असल्यास, थुंकीने काम करा. यानंतर त्याने महिलेच्या केसांवर थुंकले. त्यावेळी संकोचामुळे महिलेला प्रतिक्रिया देता आली नाही. याबाबत जावेद हबीबी यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशNational women commissionराष्ट्रीय महिला आयोग