कंगना रनौतविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:25 IST2020-11-04T02:57:46+5:302020-11-04T06:25:33+5:30
Javed Akhtar : जावेद यांनी अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

कंगना रनौतविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा दावा
मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मुलाखतीत कंगना आपल्यावर तथ्यहीन आरोप करून आपली बदनामी करत आहे, असे जावेद यांनी दाव्यात म्हटले आहे. जावेद यांनी अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणातही ठराविक लोकांना लक्ष्य केले. त्यात आपलाही समावेश केला. तसेच तिचे अभिनेता ऋतिक रोशनबरोबर असलेल्या कथित प्रेमसंबंधाविषयी कोणालाही सांगू नये, अशी धमकी आपण दिल्याचे कंगनाने म्हटले आहे, असे अख्तर यांनी दाव्यात म्हटले आहे.
कंगना रनौतच्या या विधानांमुळे लोकांचे आपल्याविषयी वाईट मत बनले आहे. आपली प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे, असे दाव्यात म्हटले आहे.