शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडण करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

जसलोक रुग्णालयाच्या डॉक्टरामुळे पॉक्सोचा गुन्हा झाला उघड; आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:35 PM

मेहुणीच्या १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या भामट्याला गावदेवी पोलिसांनी केली अटक

मुंबई - ब्रीच कॅन्डी या उच्चभ्रू परिसरातील एका घरी जेवण बनवणाऱ्याने मेहुणीच्या १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर रक्तस्त्राव झाल्यानंतर मासिक पाळीचे कारण पुढे करत या भामट्याने जसलोक रुग्णालयात तिला दाखल केले. मात्र, सतर्क डॉक्टराला काही संशयास्पद आढळून आलं आणि तपासणीदरम्यान तिच्यावर लैंगिक शोषण झाल्याचे कळाल्याने डॉक्टरने गावदेवी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर भामट्याला गावदेवी पोलिसांनी गजाआड केले. आरोपीचे नाव उदय पाल (वय 47) असं असून त्याला १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंग पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

ही दुर्दैवी घटना २७ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास ब्रीच कॅन्डी परिसरात घडली होती. मूळचा पश्चिम बंगालचा असलेला उदय पाल  व त्याचे कुटुंबीय उच्चभ्रू लोकांकडे घरकाम करण्याचे काम करतात. ब्रीच कॅन्डी येथील एका इमारतीत राहणाऱ्या वयोवृद्ध बहिणींकडे उदय जेवण बनवण्याचे काम करतो. तेथेच घरकामासाठी महिन्याभरापूर्वी पश्चिम बंगाल येथून मेहुणीची १७ वर्षीय मुलीला घेऊन आला होता. मात्र, त्याचं यामागे दुष्कृत्य दडलं होतं. मुंबईत घेऊन आलेल्या मेहुणीच्या मुलीवर उदय वारंवार विनयभंग करत होता. ज्यांच्या घरी जेवण बनविण्याचे काम करत होता त्या घराच्या मालकीणी असलेल्या वयोवृद्ध बहिणी २७ ऑक्टोबरला न्यूयॉर्कला गेल्या. याच संधीचा फायदा घेत उदयने डाव साधला. घरातले काम संपविल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी आंघोळीला गेली. त्यावेळी उदय जबरदस्तीने बाथरूममध्ये शिरला आणि बळजबरीने त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने उदय मेहुणीच्या मुलीला घेऊन जसलोक रुग्णालयात गेला. मासिक पाळीमुळे तिला त्रास होत असल्याचे त्याने डॉक्टरांना खोटी बतावणी केली.मात्र, मुलीची अवस्था पाहून  डॉक्टरांनी तात्काळ गावदेवी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, महिला पोलिसांनीपीडित मुलीकडे सखोल चौकशी केली असता तिने सर्व हकीगत सांगितली. या प्रकरणी भा. दं. वि. कलम ३७६ सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) कलम  ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करून उदय पालला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदा