लग्नाआधीच घरजावई बनला तरूण, ४ वर्ष करत राहिला रेप; ३ वेळा तरूणीचा गर्भपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:41 IST2022-05-11T16:40:47+5:302022-05-11T16:41:10+5:30
chhattisgarh Crime News : पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तरूणीवर अत्याचार केल्यावर २०१५ ते २०१९ दरम्यान तरूणी तीन वेळा गर्भवती झाली. मात्र, शारीरिक कमजोरीमुळे तिनदा गर्भपात झाला.

लग्नाआधीच घरजावई बनला तरूण, ४ वर्ष करत राहिला रेप; ३ वेळा तरूणीचा गर्भपात
chhattisgarh Crime News : छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरूणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गेल्या १० मे रोजी तक्रार दाखल करणाऱ्या तरूणी धक्कादायक माहिती दिली. तरूणीने पोलिसांना सांगितलं की, तिच्या घरी चडिया मनोरा येथे राहणारा भूपेंद्र प्रसाद २०१५ ते २०१९ दरम्यान तो घरजावई बनून राहिला होता. या चार वर्षात त्याने लग्नाचं आमिष देत तरूणीसोबत संबंध ठेवले.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तरूणीवर अत्याचार केल्यावर २०१५ ते २०१९ दरम्यान तरूणी तीन वेळा गर्भवती झाली. मात्र, शारीरिक कमजोरीमुळे तिनदा गर्भपात झाला. तरूणीची आई आरोपी भूपेंद्र प्रसादच्या आई-वडिलांकडे अनेकदा लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेली होती. पण त्यांना काहीतरी कारण देत विषय टाळला. यादरम्यान भूपेंद्रने तरूणीच्या कुटुंबियांवर मोटारसायकलसाठी दबाव टाकला. ती न दिल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तरूणीचं घर सोडून निघून गेला.
पोलिसांनुसार तक्रारदार तरूणीला माहिती मिळाली की, आरोपी भूपेंद्र प्रसाद दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करत आहे. यानंतर तिने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं. काही तासातच पोलिसांना समजलं की, आरोपी आपल्याच घरात लपून आहे. यानंतर पोलिसांच्या टीमने त्याला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.