शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 01:17 IST

हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करायचे. झांगूर आणि नसरीनसह टोळीतील इतर सदस्यांच्या कृत्यांबद्दल एटीएस अधिक माहिती गोळा करत आहे...

यूपी एटीएसने जलालुद्दीन उर्फ ​​झांगूर बाबा आणि त्याची महिला सहकारी नीतू उर्फ ​​नसरीन यांना अटक केली, यांच्यावर गैर-मुस्लिम गरीब, असहाय्य आणि गरजू लोकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा आरोप आहे. झांगूरवर ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झांगूर बाबा आणि त्याच्या टोळीने परदेशी निधीतून एका वर्षात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. त्यांनी मोठे शोरूम, बंगले आणि आलिशान गाड्या खरेदी केल्या. झांगूर बाबा आणि त्याच्या साथीदारांनी स्वतःच्या आणि त्यांच्या संस्थांच्या नावावर विविध बँकांमध्ये ४० खाती उघडली आहेत. यांत आतापर्यंत १०० कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा व्यवहार झाला आहे. हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करायचे. झांगूर आणि नसरीनसह टोळीतील इतर सदस्यांच्या कृत्यांबद्दल एटीएस अधिक माहिती गोळा करत आहे.

लखनौमध्ये तीन दिवसांपूर्वी, झांगूरच्या तावडीत अडकल्यानंतर धर्मांतर करणाऱ्यांनी, पुन्हा आपला मुळचा धर्म स्वीकारला. दरम्यान, पीडित लोकांनी विविध प्रकारचे धक्कादायक खुलासेही केले. यानंतर, एटीएसने झांगूर बाबाच्या शोधाला अधिक गती दिली होती. गेल्या वर्षी एटीएसने झांगूर बाबांविरुद्ध धर्मांतर प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक तथा सांप्रदायिकतेअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 

झांगूर बाबा आणि नसरीन हे मूळचे बलरामपूरमधील माधपूर उत्तरौला येथील रहिवासी आहेत. ते सापडत नसल्याने त्यांच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. झांगूर बऱ्याच काळापासून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत होता आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होता. यासाठी तो आणि त्याचे इतर सहकारी तरुण-तरुणींना विविध प्रकारची प्रलोभनेही देत होते.

एटीएसच्या म्हणण्यानुसार, संबंधित दोन्ही आरोपी विधवा महिलांना आमिष दाखवून, त्यांना आर्थिक मदत देऊन आणि त्यांचे लग्न करून देण्याचे आश्वासन देत त्यांना फसवत असत. एवढेच नाही तर, या लोकांनी अनेक असहाय्य लोकांना धमक्या देऊन त्यांचे धर्मांतरण केले आहे, असे अनेक पीडित लोकांनी म्हटले आहे.

झांगूरचा मुलगा आणि सहकारी एप्रिलमध्ये पकडले गेले -एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, झांगूर बाबा हा धर्मांतरात सहभागी असलेल्या या टोळीचा प्रमुख आहे. त्याचा मुलगा मेहबूब देखील त्याच्यासोबत या कामात सहभागी होता. मेहबूब आणि त्याचा साथीदार नवीन उर्फ ​​जमालुद्दीन यांना या वर्षी ८ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. दोघेही लखनऊ तुरुंगात आहेत. दोघांनीही धर्मांतरात मदत करणाऱ्या त्यांच्या अनेक साथीदारांची नावे उघड केली आहेत. एटीएस त्यांचाही शोध घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMuslimमुस्लीमIslamइस्लाम