Maharashtra Crime: हादरवून टाकणारी एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने एका महिलेची डोक्यात दगडाने हल्ला करून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्या केल्याची कबुली दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात ही घटना घडली आहे. टेंभी अंतरवाली गावातील मीराबाई बोंढारे या महिलेने शेतातच शेजारी राहणाऱ्या मुलाकडून मोबाईल घेतला. कॉल करण्यासाठी महिलेने मोबाईल घेतला होता.
वाचा >>"साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा"; ढसाढसा रडत पतीची पोलिसांत धाव
महिलेकडून चुकीने मोबाईल पाण्यात पडला आणि खराब झाला. महिलेने पाण्यात पाडून मोबाईल खराब केल्याचा मुलाला राग आला. १३ वर्षाच्या मुलाने रागाच्या भरात मीराबाई यांच्या डोक्यात दगड घातला आणि हत्या केली.
हत्या केल्याचे कसे आले उघडकीस?
२५ मार्च रोजी ही घटना घडली होती. हत्या झाल्याचे समोर आले. पण, हत्या कोणी केली आणि का केली? याबद्दल कोणतीही माहिती प्राथमिक तपासात कळली नाही.
त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी संबंधित मुलालाही ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांना घाबरून त्याने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. मोबाईल खराब केल्याच्या रागातून हत्या केल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांनी या मुलाला बालसुधारगृहात पाठवले असून, ही घटना समोर आल्यानंतर पंचक्रोशीतील गावांमध्ये खळबळ उडाली आहे.