शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या बहाण्याने बोलावलं अन् संपवलं! किरकोळ वादातून मित्राचीच हत्या; मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 20:32 IST

जळगावात जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. एका फायनान्स कंपनीत एकत्र काम करणाऱ्या मित्रांमधील जुन्या वादाचे पर्यावसान हत्येत झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जामनेर येथील रहिवासी असलेल्या नीलेश राजेंद्र कासार (वय २७) या तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात बांधून धरणात फेकून दिला होता. एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावत दोन संशयितांना गुजरातधून बेड्या ठोकल्या आहेत.

मयत नीलेश कासार हा जळगावमधील एका फायनान्स कंपनीत कार्यरत होता. त्याचे सहकारी दिनेश चौधरी (वय २०) आणि माजी सहकारी भूषण पाटील (वय २०) यांच्याशी नीलेशची जुनी मैत्री होती. मात्र, भूषण आणि नीलेश यांच्यात काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. भूषणने या भांडणाची मनात खुन्नस धरली होती आणि नीलेशचा काटा काढण्याचे ठरवले.

कामाचे निमित्त करून रचला मृत्यूचा सापळा

१५ डिसेंबर रोजी भूषणने एका फायनान्स फाईलच्या मंजुरीवर चर्चा करायची आहे, असे सांगून नीलेशला शिरसोली येथे बोलावून घेतले. नीलेश आपल्या दुचाकीने तेथे गेला असता, भूषण आणि दिनेशने त्याच्याशी पुन्हा जुना वाद उकरून काढला. या वादातून दोघांनी नीलेशचा गळा आवळून त्याला जिवे मारले. यानंतर त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरला आणि रामदेववाडी परिसरातील जंगलात असलेल्या नेव्हरे धरणाच्या पाण्यात फेकून दिला.

असा लागला गुन्ह्याचा छडानीलेश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना रामदेववाडी परिसरात नीलेशची दुचाकी बेवारस स्थितीत सापडली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तांत्रिक तपास करत कॉल डिटेल्स तपासले, ज्यात नीलेशचे शेवटचे बोलणे दिनेश आणि भूषणशी झाल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपींचे मोबाईल बंद असल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचे लोकेशन शोधले आणि गुजरातमध्ये धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी खुनाची कबुली दिली आणि मृतदेह कुठे टाकला याची माहिती दिली.

धरणातून कुजलेल्या स्थितीत मृतदेह बाहेर

शुक्रवारी सकाळी पोलिसांनी नेव्हरे धरणात शोधमोहीम राबवली. सुमारे चार दिवसांपासून पाण्यात असल्याने नीलेशचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड आणि सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

जामनेरमध्ये शोककळा

नीलेश हा जामनेर येथील प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी राजेंद्र कासार यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी जामनेरमधील दत्त चैतन्य नगर येथील निवासस्थानी आणण्यात आला. नीलेशच्या निधनाने त्याच्या वृद्ध आई-वडिलांना आणि बहिणीला मोठा धक्का बसला आहे. परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस