दिरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 00:05 IST2019-03-23T00:05:08+5:302019-03-23T00:05:23+5:30
वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या दिराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन त्याच्या वहिनी आणि महिला पोलीस प्रविणा जाधव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा
जळगाव- वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून सख्ख्या दिराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन त्याच्या वहिनी आणि महिला पोलीस प्रविणा जाधव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत गणपत सपकाळे (रा. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. भरतची वहिनी प्रविणा जाधव ह्या हिस्सा देण्यासाठी नकार देत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. या वादातूनच ११ मार्च रोजी दुपारी भरत याने विषारी द्रव सेवन केले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. २१ रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी भरतची पत्नी आशाबाई सपकाळे यांच्या फिर्यादीवरून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातील महिला पोलीस प्रविणा गजानन जाधव यांच्याविरुध्द शनिपेठ पोलिसात भादंवि कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.