शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नी पतीला म्हणाली - Get Out..., नंतर झालेला खुलासा ऐकून पती 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:06 IST

Jaipur Crime News : पीडित पतीने तक्रारीत सांगितलं की, पत्नी त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची आणि तिचा प्रियकर त्याला जीवे मारण्याची धकमी देत आहे. 

लग्न म्हटलं की, तरूण-तरूणींच्या खूप अपेक्षा असतात. संसाराची वेगवेगळी स्वप्ने ते रंगवत असतात. पण अनेक ही स्वप्न फक्त स्वप्नच राहतात. अशाच मोठ्या अपेक्षा घेऊन चार महिन्यापूर्वी लग्न केलेला तरूण आता पत्नी आणि तिच्या प्रियकरापासून वाचण्यासाठी पोलिसांकडे गेला आहे. जयपूरमध्ये (jaipur Crime News) पत्नीला वैतागलेल्या एका पतीने पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पीडित पतीने तक्रारीत सांगितलं की, पत्नी त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची आणि तिचा प्रियकर त्याला जीवे मारण्याची धकमी देत आहे. 

मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीने केला खुलासा

News 18 च्या एका वृत्तानुसार, पीडित पतीने पोलिसांना सांगितलं की, दोन्ही परिवार आणि पत्नीच्या सहमतीने आनंदात लग्न पार पडलं होतं. यानंतर पत्नीने पतीसमोर खुलासा केला की, ती दुसऱ्या तरूणावर प्रेम करते. पीडितने पोलिसांना सांगितलं, १७ नोव्हेंबर २०२१ ला त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर पहिली रात्र साजरी करण्यासाठी तो पत्नीजवळ रूममध्ये गेला तेव्हा ती रागाने त्याला 'गेट आउट, इथून जा', असं म्हणाली. तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. तिने सांगितलं की, ती अशोक नावाच्या तरूणावर प्रेम करते आणि ती केवळ त्याचीच आहे. पत्नीने सांगितलं की, तिच्या घरातील लोकांनी तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं.

मुलीला न समजावता तरूणावर ओरडले सासरचे लोक

मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीकडून हे ऐकायला मिळाल्यावर तरूणाला धक्का बसला. तो पत्नीला समजावण्यासाठी सासरच्या लोकांसोबत बोलला. तर सासरचे लोक मुलीला समजावणं सोडून पीडित तरूणावरच ओरडले. यानंतर पीडित पतीने पोलिसांकडे मागणी केली की, त्याला पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून वाचवा. त्याचा जीव धोक्यात आहे. पत्नी त्याला कधीही खोट्या केसमध्ये अडकवू शकते. 

प्रियकराने दिली जीवे मारण्याची धमकी

पीडित तरूण बढारणा रोडवरील पंच कॉलनीमध्ये राहतो. पीडित म्हणाला की, पत्नीचा प्रियकर अशोकला पत्नीपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. पण तो काहीही ऐकायला तयार नाही. इतकंच नाही तर उलट त्यानेच पीडित तरूणाला पत्नीला त्रास न देण्यास सांगितलं. तसेच तिच्यासोबत संबंध ठेवले तर जीव घेईन अशी धमकी दिली. तीन महिने हा त्रास सहन केल्यावर पीडित पतीने पोलिसात तक्रार दिली.

खोट्या केसची धमकी

पीडित तरूणाने रिपोर्टमध्ये सांगितलं की, गेल्या तीन महिन्यांपासून त्याने त्याच्या पत्नी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नाही. ती नेहमी हेच सांगते की ती फक्त तिच्या प्रियकराची आहे आणि त्याचीच होणार. पुन्हा पुन्हा समजावलं तर खोट्या केसमध्ये अडकवण्याची धकमी देऊ लागते. पत्नीचा प्रियकरही गप्प राहण्याचा सल्ला देता आणि काही केलं तर जीवे मारण्याची धमकी देतो. एकदा अशोकने घरी येऊन त्याला मारहाणही केली आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीmarriageलग्न