जयपूरमधील मानसरोवर येथील नीरजा मोदी शाळेत एक धक्कादायक घटना घडली. चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अमायरा असं विद्यार्थिनीचं नाव असून ती ९ वर्षांची होती. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झालं. एवढ्या लहान मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
मुलीने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थी घटनास्थळी धावले. मुलीला मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. नंतर शाळा प्रशासनाने मुलीच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. तसेच रक्त सांडलेल्या जागेची साफसफाई केली. शाळा प्रशासनाने पुरावे नष्ट केल्यानं प्रकरण आणखी चिघळलं. मानसरोवर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरू केली.
अमायरा ही तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी होती. या घटनेने आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिचे वडील विजय सिंह एलआयसी अधिकारी आहेत, तर तिची आई शिबानी बँक ऑफ बडोदाच्या मालवीय नगर शाखेची चीफ मॅनेजर आहे. मुलीच्या वडिलांनी मानसरोवर पोलिस ठाण्यात नीरजा मोदी स्कूल व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी आरोप केला की, त्यांची मुलगी आनंदात शाळेत गेली. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाला.
अमायरा नावाची मुलगी चौथी इयत्तेत शिकत होती आणि तिचा वर्ग ग्राऊंड फ्लोरवर आहे. शाळेच्या कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामध्ये ती पायऱ्यांवरून चौथ्या मजल्यावर जाताना दिसते. चौथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर अमायरा काही वेळ रेलिंगवर बसते आणि नंतर काही सेकंदात खाली उडी मारते असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : Jaipur: A 9-year-old student died after jumping from her school's fourth floor. The school allegedly tried to destroy evidence. Police are investigating the incident, in which the girl's parents have filed a complaint against the school's management, alleging negligence.
Web Summary : जयपुर: एक 9 वर्षीय छात्रा ने स्कूल की चौथी मंजिल से कूदकर आत्महत्या कर ली। स्कूल पर सबूत नष्ट करने का आरोप है। पुलिस मामले की जांच कर रही है। बच्ची के माता-पिता ने स्कूल प्रबंधन पर लापरवाही का आरोप लगाते हुए शिकायत दर्ज कराई है।